AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“ज्यांना शिवसेनेचा स्थापना दिवस माहिती नाही, खोटे सातबारे घेऊन फिरतात, त्यांच्यावर काय बोलावं?”

Sanjay Raut on CM Eknath Shinde : शिवसेनेच्या वर्धापन दिनी संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर घणाघात; शिवसेनेचा इतिहास सांगताना साधला निशाणा

ज्यांना शिवसेनेचा स्थापना दिवस माहिती नाही, खोटे सातबारे घेऊन फिरतात, त्यांच्यावर काय बोलावं?
| Updated on: Jun 19, 2023 | 11:06 AM
Share

मुंबई : आज शिवसेनेचा 57 वा स्थापना दिवस आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. याच विषयावर खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. तसंच पठाण सिनेमाचा दाखला देत आदिपुरूष सिनेमावरूनही भाजपला त्यांनी खडा सवाल केलाय.

आज शिवसेनेचा 57 ना वर्धापन दिवस आहे. पण काल काही ठिकाणी मी गद्दार गटाचे बॅनर पाहिले. त्यावर लिहिलंय की शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन आहे. त्यांना शिवसेनेच्या स्थापना दिवसाची तारीख माहिती नाही. ते शिवसेनेवर दावा सांगत आहेत. निवडणूक आयोगाकडून कागद आणत आहेत. बोगस सातबारा! अब्दुल सत्तार यांच्या काळात बोगस सातबाऱ्याची प्रकरणं फार वाढली आहेत. हा अब्दुल सत्तारनं लिहिलेला सातबारा आहे, 59 वा वर्धापन दिन. यांना तारीख माहिती नाही. वर्धापन दिनाचं वर्ष माहिती नाही. त्यांच्यावर काय बोलावं, असं संजय राऊत म्हणालेत.

शिवसेनेचा आज 57 वा वर्धापन दिवस आहे. या 57 वर्षात अनेक चढ- उतार आले. कठीण काळानंतरही शिवसेना पुन्हा उभी राहिली. मुंबई ठाण्याच्या पुढे शिवसेना जाणार नाही, असं पक्षाच्या स्थापनेनंतर म्हटलं जायचं. पण त्याच शिवसेनेनं दिल्लीपर्यंत धडक मारली. देशाच्या अनेक प्रश्नांमध्ये शिवसेनेनं योगदान दिलं. जम्मू काश्मीरपर्यंत शिवसेना गेली. त्यामुळे ज्यांना वाटत या गद्दारांच्या बंडामुळे शिवसेना संपेल तर तसं होणार नाही. शिवसेना पुन्हा उभी राहिल, असं संजय राऊत म्हणालेत.

बाळासाहेब ठाकरे यांचा विचार कधी मरत नसतो. तो चोरला जाऊ शकत नाही. असे अनेक चोर त्या काळातही निर्माण झाले. पण बाळासाहेबांनी त्यांना ढेकमामसारखं चिरडून टाकलं. आताही जे असं करत आहेत. त्यांचीही तीच अवस्था होणार आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन मेळावे आज होत आहेत. पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त हे मेळावे होत आहेत. ठाकरे गटाचा मेळावा किंग्ज सर्कलमधल्या षण्मुखानंद हॉलमध्ये संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता उद्धव ठाकरे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. तर शिंदे गटाचा मेळावा गोरेगावच्या नेस्को सेंटर इथे होणार आहे.

शिवसेनेच्या वर्धापनदिनी बॅनरवॉर!

मुंबईच्या वांद्रे भागातील कलानगरमधल्या रस्त्यावर जागोजागी होर्डिंग्ज आणि बॅनर्स लावण्यात आले आहेत. कलानगरच्या ब्रीजवरही शिंदे गटाचे होर्डिंग्ज आणि बॅनर्स लागल्याचं पाहायला मिळतंय.

शिवसेना वर्धापन दिनी नाशिकमध्ये बॅनर वॉर पाहायला मिळतंय. शिंदे गट आणि ठाकरे गटाकडून बॅनर वॉर सुरू आहे. एकमेकांच्या समोर बॅनर लावत दोन्ही गटांकडून शहरात जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. ठाकरे गटाच्या कार्यालयाबाहेर देखील शिंदे गटाचे बॅनर पाहायला मिळतोय.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.