AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आणखी एक आमदार जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत?; वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला धक्यावर धक्के!

One More MLA May be Resign From Shivsena Uddhav Balasaheb Thackeray Group : वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला धक्यावर धक्के! शिशिर शिंदे यांच्या पाठोपाठ आणखी एक आमदार जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत

आणखी एक आमदार जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत?; वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला ठाकरे गटाला धक्यावर धक्के!
| Updated on: Jun 18, 2023 | 10:48 AM
Share

मुंबई : शिवसेना पक्षाचा उद्या स्थापना दिवस आहे. त्याआधी ठाकरे गटाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. काल शिशिर शिंदे यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचा आणखी एक आमदार शिवसेना ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर निर्माण झालेली अस्वस्थता, नाराजी अद्याप कमी झालेली नाही असंच दिसतंय.

नाराज आमदार शिवसेनेत जाणार?

ठाकरे गटाच्या महिला आमदार नाराज असल्याची माहिती आहे. त्या लवकरच ठाकरे गटाला रामराम करणार असल्याची माहिती आहे. शिवाय लवकरच त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

मनिषा कायंदे नॉट रिचेबल

शिवसेनेच्या नेत्या, विधानपरिषदेच्या आमदार मनिषा कायंदे नॉट रिचेबल आहेत. त्यांचा फोन बंद आहे. शिवाय त्यांच्याशी संपर्क होत नाहीये. त्यामुळे ठाकरे गटात नाराज असलेल्या आमदार या मनिषा कायंदे असल्याचं बोललं जात आहे.

केवळ मनिषा कायंदेच नव्हे तर तीन माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती आहे. आज रात्री हा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

खासदार संजय राऊत यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. हा कचरा इकडे तिकडे उडत असतो. हवेचा झोका बदलला की तो कचरा पुन्हा आमच्या दारात येऊन पडतो, असं संजय राऊत म्हणालेत.

शिशिर शिंदे यांचा जय महाराष्ट्र!

शिशिर शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे. ठाकरे गटाचं उपनेतेपद शिशिर शिंदे यांच्याकडे होतं. या उपनेतेपदाचा राजीनामा शिशिर शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. तसं पत्र शिशिर शिंदे यांनी ठाकरेंना लिहिलं आहे. त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांच्याकडे दिलं आहे. या पत्रात त्यांनी राजीनामा देण्यामागची सविस्तर भूमिका मांडली आहे. पक्षात काम करण्याची संधी मिळत नसल्याची खंत शिशिर शिंदे यांनी पत्रात व्यक्त केली आहे. पक्षात घुसमट होत असल्याचं शिशिर शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?
उपमुख्यमंत्री कोण? सुनेत्रा पवार यांच्यासह या दोन नावांचीही चर्चा?.
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?
दादा तुम्ही वेळ चुकवली...; फडणवीसांचा भावुक लेख, लेखात नेमकं काय?.
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक
अजितदादांचा शासकीय बंगला 'विजयगड'मधील वातावरण भावूक.
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला
पानभर जाहिराती कसल्या देताय? संजय राऊतांचा भाजपवर जोरदार हल्ला.
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे..
सोनं-चांदी भावात ऐतिहासिक उसळी; 10 ग्रामसाठी मोजावे लागणार इतके पैसे...
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना
पुणे आणि बारामतीची पोकळी भरू शकत नाही; नागरिकांनी व्यक्त केल्या भावना.
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन
अंत्यविधीनंतर शरद पवार, सुप्रिया सुळे, जय पवारांचे भावूक अभिवादन.
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद
अजित पवार यांच्या निधनानंतर इगतपुरीमध्ये व्यापाऱ्यांकडून बंद.
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर
अर्ध्या वरती डाव मोडला..; पिंकी माळीवर अंत्यसंस्कार, पतीला अश्रु अनावर.
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?
मोठा झटका... UGCच्या नियमांना सुप्रीम कोर्टाची स्थगिती; काय दिलं कारण?.