AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“अजितदादानं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेताच भांवडांनी शरद पवारांना फोन केला अन् म्हणाले…”

Supriya Sule on Sharad Pawar Family : अजित पवार भाजपसोबत जाण्याने पवार कुटुंबात कोणते बदल झाले? जेव्हा पवार बंधूंनी शरद पवारांना फोन केला तेव्हा नेमकं काय घडलं? सुप्रिया सुळे यांनी पवार बंधूंचं 'सिक्रेट' सांगितलं, म्हणाल्या भांवडांनी शरद पवारांना फोन केला अन्...

अजितदादानं भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेताच भांवडांनी शरद पवारांना फोन केला अन् म्हणाले...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 05, 2023 | 1:15 PM
Share

मुंबई | 05 ऑक्टोबर 2023 : अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पवार कुटुंबाची भूमिका काय असेल? असा प्रश्न चर्चेत राहिला. अजित पवारांच्या या निर्णयाने पवार कुटुंबाचा राजकीय विचार दोन भागात विभागला गेला. अजित पवारांनी शरद पवारांच्या राजकीय भूमिकेविरोधात जात भाजपला साथ दिली. तेव्हा घडलेला प्रसंग खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितला. शरद पवारांच्या भावांची काय भूमिका होती? त्यांनी, यावर सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. तसंच भाजपने जनतेसमोर राष्ट्रवादीची माफी मागावी, असंही त्या म्हणाल्या. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया सुळे यांनी या बाबींवर भाष्य केलंय.

अजितदादांनी जेव्हा भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा पवारांच्या भावांनी त्यांना फोन केला आणि सांगितलं, तुला लढायचं आहे. यांचं वय आहे 83 84 85… या वयात ही भावंडं एकमेकांना फोन करतात आणि सांगतात की, तू लढ… 75 वर्षांचे प्रतापराव पवार हे वयाने पवारसाहेबांपेक्षा लहान आहेत. ते फोन करतात अन् म्हणतात, तुम्हाला लढायचं आहे. त्यामुळे यांच्या आईने यांना काय खाऊ घातलं हे माहिती नाही. आजही हे सगळे लढण्याची भाषा करतात. कोणत्याही परिस्थितीला शरण जात नाहीत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पहाटेच्या शपथविधीविषयी जेव्हा प्रश्न विचारण्याता आला. तेव्हा हा आमचा दोष नाही. तर याविषयी अजित पवारांना सांगायला हवं. आम्ही 11 वाजता शपथ घेतो. ते सकाळी सातला शपथ घेतात. आम्ही 11 वाजता शपथ घेतो. पण इतर वेळी लोकांसाठी आम्ही सकाळी साडे सहालाच तयार असतो, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमच्या पक्षावर टीका केली. आमच्या पक्षावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. त्यांनी ते आरोप सिद्ध करून दाखवावेत. तसं नसेल तर त्यांनी देशाच्या जनतेसमोर राष्ट्र्वादीची माफी मागायला हवी. राष्ट्र्वादीवर केलेल सर्व आरोप राजकीय हेतूने केले होते, हे देखील स्पष्टपणे सांगावं, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज दिलं आहे.

Follow Us
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ
अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा
Amit Shah | अमित शाहांनी मुंबईतून दिली दोन मोठी अपडेट! सेवा संकल्प अभियानची घोषणा, पुढे म्हणाले...
नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब...
Nanded | नांदेडमध्ये दुष्काळग्रस्तांची दहीहंडी! दीड महिन्यापासून पाऊस गायब; शेतकऱ्यांनी चौकात मांडली करपलेल्या पिकांची व्यथा
जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू...
Radhakrishna Vikhepatil | जरांगेंना विखे पाटलांची कळकळीची विनंती! चर्चेतून मार्ग काढू... मराठा आरक्षणावर मोठी अपडेट समोर
तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं!
Shivendraraje Bhonsle | तोंडाला पाने पुसण्यापेक्षा कोर्टात टिकणारं आरक्षण हवं! शिवेंद्रराजे भोसले स्पष्टच बोलले, पुढे म्हणाले...
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच