महापालिका पोटनिवडणुकीतही भाजपची दाणादाण, 7 पैकी 5 जागांवर पराभव

जिल्हा परिषदेनंतर आता पालिका पोटनिवडणुकींमध्येही (Municipal corporation bypoll) भाजपला धक्का बसल्याचं दिसून आलं आहे. कारण सहा महापालिकेतील 7 जागांपैकी चार 5 जागांवर भाजपचा पराभव झाला आहे.

महापालिका पोटनिवडणुकीतही भाजपची दाणादाण, 7 पैकी 5 जागांवर पराभव
Follow us
| Updated on: Jan 10, 2020 | 4:27 PM

मुंबई : राज्यातील विविध महापालिकांतील पोटनिवडणुकीचे निकाल हाती आले आहेत. सहा महापालिकांमधील रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक झाली. मात्र  जिल्हा परिषदेनंतर आता पालिका पोटनिवडणुकींमध्येही (Municipal corporation bypoll) भाजपला धक्का बसल्याचं दिसून आलं आहे. कारण सहा महापालिकेतील 7 जागांपैकी चार 5 जागांवर भाजपचा पराभव झाला आहे. मुंबई, नाशिक, मालेगाव आणि लातूरमध्ये भाजपला धक्का बसला आहे. तर पनवेल आणि नागपूर पालिका पोटनिवडणुकीत भाजपला (Municipal corporation bypoll) यश आलं.

मुंबईत शिवसेनेचा विजय मुंबई महापालिकेच्या मानखुर्द पोटनिवडणुकीत शिवसेनेचा विजय झाला. महापालिका प्रभाग क्रमांक 141 पोटनिवडणुकीत काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले विठ्ठल लोकरे विजयी झाले आहेत. लोकरे यांनी भाजपाचे बबलू पांचाळ यांचा पराभव केला. यामुळे शिवसेनेच्या संख्याबळात एकने वाढ होऊन 96 झाली आहे. 2017 मध्ये लोकरे या विभागात काँग्रेसच्या तिकिटावर विजयी झाले होते. मात्र विधानसभा निवडणूक त्यांनी शिवसेनेतून लढवली. मात्र तिथे त्यांचा पराभव झाला. त्यामुळे शिवसेनेने त्यांना पोटनिवणुकीत पुन्हा एकदा उमेदवारी दिली होती.

पनवेलमध्ये भाजपचा विजय पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 19 ब मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने आपला गड राखला. भाजपच्या रुचिता लोंढें पोटनिवडणुकीत महाविकासआघाडीच्या स्वप्नल कुरघुडेंचा पराभव केला. 3820 मताधिक्याने रुचिता लोंढे विजयी झाल्या आहेत. रुचिता लोंढे यांना 6 हजार 231, तर स्वप्नल कुरघुडे यांना 2 हजार 387 मतं मिळाली.

नाशिकमध्ये महाविकास आघाडी

नाशिक महापालिकेच्या प्रभाग 22 आणि 26 च्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. प्रभाग क्रमांक 22 मध्ये राष्ट्रवादीचे जगदीश पवार तर प्रभाग 26 मध्ये शिवसेनेचे मधुकर जाधव विजयी झाले.  या निकालामुळे नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचं दिसून आलं.

नागपूर पोटनिवडणुकीत भाजपची बाजी

नागपूरपालिका पोट निवडणुकीत भाजपाचं कमळ फुललं आहे. भाजपाचे उमेदवार विक्रम ग्वालबंशी प्रचंड मताधिक्यांनी विजयी झाले. काँग्रेसचे पंकज शुक्लासह सर्वच उमेदवारांचे डिपॉजिट जप्त झालं. विक्रम ग्वालबंशी यांनी 13 हजार 386 हजार मतांनी विजय मिळवला.

मालेगावात एमआयएमचा विजय

मालेगाव महापालिकेच्या प्रभाग क्र 12 ड साठी घेण्यात आलेल्या पोटनिवडणुकीत जनता दल एमआयएम महाआघाडीचे मुस्तकीम डिग्नेटींनी एकतर्फी विजय मिळवला. त्यांच्याविरोधात असलेल्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. मुस्तकीम यांना 7992 मते मिळाली तर काँग्रेसच्या फारूक कुरेशींना 510 तर अपक्ष इम्रान अन्सारींना 815 मते मिळाली.

2017 साली झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीत जनता दल शहराध्यक्ष बुलंद इकबाल हे विजयी झाले होते. काही दिवसांपूर्वी त्यांचं आकस्मित निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. जनता दलाचे मुस्तकीम यांच्या रूपाने आपली जागा राखण्यास यश मिळवले आहे. बुलंद इकबाल यांच्या निधनामुळे अपूर्ण राहिलेल्या कामांना प्राधान्याने पूर्ण करून महापालिकेत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणार असल्याचे विजयी झालेले मुस्तकीम डिग्नेटि यांनी सांगितले.

Non Stop LIVE Update
गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.