AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MVA: महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात राज्यपाल सक्रिय, केंद्राकडे सीआरपीएफ फोर्सची मागणी, गृहसचिवाला पत्र

शिवसैनिकांकडून होणारा हिंसाचार पाहता आधीच केंद्राने काही आमदारांच्या कुटुंबियांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यात आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

MVA: महाराष्ट्राच्या राजकीय नाट्यात राज्यपाल सक्रिय, केंद्राकडे सीआरपीएफ फोर्सची मागणी, गृहसचिवाला पत्र
Image Credit source: tv9
| Updated on: Jun 26, 2022 | 8:49 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसात राज्यात मोठा पॉलिटिकल ड्रामा सुरू आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचं बंड हे देशभर गाजत आहेत. अशात राजपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना कोरोना झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. आजच ते बरे झाले. बरे होताच आता राज्यपाल पुन्हा राजकीय नाट्यात एक्टिव्ह मोडवर आले आहेत. त्यांनी बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी आधी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिलं. त्यानंतर त्यांनी आता थेट केंद्रीय गृह सचिवालयाला पत्र लिहीत केंद्राकडे सीआरपीएफ फोर्सची (CRPF) मागणी केली आहे. त्यामुळे आता राज्यपालांच्या मागणीवर केंद्र ठोस पाऊलं उचलत आणखी सीआरपीएचे जवान तैनात करणार का? हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे. शिवसैनिकांकडून होणारा हिंसाचार पाहता आधीच केंद्राने काही आमदारांच्या कुटुंबियांना वाय दर्जाची सुरक्षा दिली आहे. त्यात आता आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यपालांचं पत्र जसच्या तसं

गृहमंत्रालयाचाही हाय अलर्ट

दुसरी राज्यातही हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. “कायदा आणि सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्भवल्यास त्याला सामोरे जाण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सतर्क आणि सज्ज आहेत. राज्याच्या विविध भागात प्रतिबंधात्मक आदेश लागू आहेत. शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल.” अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विटवरून दिली आहे.

दिलीप वळसे-पाटलांचं ट्विट

शिवसैनिकांनी रान पेटवलं, तर शिंदे समर्थकांचाही इशारा

एकीकडे ठाकरे समर्थक शिवसैनिक रोज बंडखोरंविरोधात आंदोलन करत आहे. अनेक ठिकाणी बंडखोरांचे पुतळे जाळण्यात येत आहे. तर  अनेकांच्या पोस्टरला काळे फासले आहे. अनेकांच्या ऑफीसचा चुराडा केला आहे. तर दुसरीकडे शिंदे समर्थकांकडूनही आंदोलन करण्यात येत आहे. शिंदे समर्थकांनीही इशारा दिला आहे. त्यामुळे आता दोन्ही कार्यकर्ते आमनेसामने येऊन नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात येत आहे. तर बंडखोर आमदारांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची काळजी लक्षात घेऊन आता राज्यपालही केद्राकडे वेळ पडल्यास अतिरिक्त सुरक्षेची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे राज्यातील पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे.

आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास
मुंबईत फक्त ठाकरे ब्रँडच चालेल! अविनाश जाधव यांनी व्यक्त केला विश्वास.
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा
आम्ही काँग्रेसला हव्या त्या जागा...; जागावाटपावर राऊतांचा खुलासा.
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
गौतम अदानी आणि पवार एकाच मंचावर; संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.