सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळविल्याचा आरोप, फडणवीसांना हायकोर्टाची नोटीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Nagpur Bench Devendra Fadnavis Axis Bank) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आणखी एक दणका दिला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळविल्याचा आरोप, फडणवीसांना हायकोर्टाची नोटीस

नागपूर : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Nagpur Bench Devendra Fadnavis Axis Bank) यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आणखी एक दणका दिला आहे. पदाचा गौरवापर करुन सरकारी कर्मचाऱ्यांची खाती अॅक्सिस बँकेत वळविल्याचा आरोप, देवेंद्र फडणवीसांवर (Nagpur Bench Devendra Fadnavis Axis Bank)आहे. याच प्रकरणात नागपूर खंडपीठाने  फडणवीस यांच्यासह राज्याच्या मुख्य सचिवांनाही नोटीस पाठवली आहे. या नोटीसमध्ये देवेंद्र फडणवीसांना आठ आठवड्यात उत्तर देण्यास बजावलं आहे. मोहनीश जबलपुरे यांनी फडणवीसांविरोधात याचिका दाखल करुन, त्यांच्यावर पदाचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

नेमके आरोप काय?

महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांची पगाराची खाती सरकारी बँकेऐवजी अॅस्किससारख्या खासगी बँकेत वळवल्याचा आरोप आहे. महत्त्वाचं म्हणजे याच बँकेत फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीस उच्च पदावर कार्यरत होत्या. त्यामुळे फडणवीसांनी पदाचा गैरवापर करुन सरकारी बँकेऐवजी खासगी बँकेत खाती वळवली असा आरोप, याचिकाकर्त्याचा आहे.

तत्कालिन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशानुसार ही खाती वर्ग करण्यात आल्याचा दावा करत नागपूरमधील सामाजिक कार्यकर्ते मोहनीश जबलपुरे यांनी ऑगस्टमध्ये अंमलबजावणी संचालनालयाकडे (ईडी) याचिका दाखल केली होती. अमृता फडणवीस अ‍ॅक्सिस बँकेच्या उपाध्यक्ष आणि पश्चिम भारताच्या कॉर्पोरेट प्रमुख आहेत. या हस्तांतरणाचा फायदा ‘अ‍ॅक्सिस बँके’ला झाला, मात्र स्टेट बँकेला मोठा तोटा सहन करावा लागला, असा दावा जबलपुरे यांनी केला.

फडणवीसांचं स्पष्टीकरण

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनीही वेळोवेळी स्पष्टीकरण देऊन, आपण असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचा दावा केला आहे. मार्च 2005 मध्ये म्हणजेच अमृता यांच्याशी लग्न होण्याच्या आठ महिने आधीच ही खाती अ‍ॅक्सिस बँकेत उघडली गेल्याचा दावा, देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी केला होता.

‘अ‍ॅक्सिस बँक किंवा सरकारी खात्यांशी संबंधित कोणत्याही बँकांची निवड मागील काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने केली होती. जर सरकारमधील एखाद्याला असं वाटतं, की माझी पत्नी त्या बँकेत काम करते, म्हणून ते माझ्या सरकारची बदनामी करु शकतात, तर तसं होणार नाही. माझी पत्नी कधीच सरकारी कार्यालयात आली नाही किंवा पाच वर्षांत एखाद्या सरकारी अधिकाऱ्याशी तिने भेट घेतलेली नाही, असं स्पष्टीकरण फडणवीस यांनी दिलं होतं.

अॅक्सिस बँकेने यापूर्वी मांडलेली बाजू

‘अ‍ॅक्सिस बँक ही देशातील एक जबाबदार बँकिंग आणि वित्तीय संस्था आहे. सैन्य आणि पोलिस या दोन्ही गणवेशधारक दलांची सेवा करणे हे अ‍ॅक्सिस बँकेचं लक्ष्य तर आहेच, पण अभिमानास्पद बाबही आहे. आम्ही देश आणि राज्यांमध्ये गुंतवणूक करत राहू’ असं अ‍ॅक्सिस बँकेचे कार्यकारी संचालक राजेश दहिया यांनी पत्रक काढून (Axis Bank Salary Accounts) म्हटलं होतं.

ठाकरे सरकारच्या हालचाली 

पोलिस विभागाची वेतन खाती (सॅलरी अकाऊण्ट्स) अ‍ॅक्सिस बँकेतून हलवण्याच्या हालचाली (Axis Bank Salary Accounts) ठाकरे सरकारने सुरु केल्या आहेत. जवळपास दोन लाख पोलिसांची अकरा हजार कोटी रुपयांची खाती पुन्हा राष्ट्रीयकृत बँकेकडे वळवली जाण्याची चिन्हं आहेत.

महाराष्ट्र राज्य पोलिस विभागात दोन लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांचे वार्षिक पगार 11 हजार कोटींपेक्षा जास्त आहेत. काही वर्षांपूर्वी पोलिस विभागातील बहुतांश वेतन खाती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’कडून अ‍ॅक्सिस बँकेत हस्तांतरित करण्यात आली होती. माजी मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस ‘अ‍ॅक्सिस बँके’त उच्च पदावर कार्यरत असल्यामुळे याचा संबंध जोडला जात होता.

संबंधित बातम्या 

ठाकरे सरकारचा आणखी एक दणका, अ‍ॅक्सिस बँकेतील ‘ती’ खाती वळवणार?  

अ‍ॅक्सिस बँकेतील सरकारी खाती तातडीने वळवा, ठाणे महापौरांचा आदेश

Published On - 5:20 pm, Thu, 5 March 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI