नागपुरात भाजपकडून अनेक महिला नगरसेविकांचं तिकीट कापण्याची शक्यता, नेमकं कारण काय?

| Updated on: Oct 23, 2021 | 12:56 PM

आगामी महापालिका निवडणुकीत भाजपमधील अनेक महिला नगरसेविकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. सध्या नागपुरात भाजपच्या 52 पेक्षा जास्त महिला नगरसेविका आहेत.

नागपुरात भाजपकडून अनेक महिला नगरसेविकांचं तिकीट कापण्याची शक्यता, नेमकं कारण काय?
भाजप लोगो, नागपूर महापालिका
Follow us on

नागपूर : आगामी महापालिका निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागल्याचं पाहायला मिळतंय. नागपुरात जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत झटका बसल्यानंतर आता भाजपनं महापालिका निवडणुकीसाठी मोठी खबरदारी घेतल्याचं दिसून येत आहे. आगामी महापालिका निवडणुकीत भाजपमधील अनेक महिला नगरसेविकांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. सध्या नागपुरात भाजपच्या 52 पेक्षा जास्त महिला नगरसेविका आहेत. (BJP is likely to cut the tickets of many existing women corporators)

कोरोना काळात लोकांच्या मदतीला धावून जाणे अपेक्षित होते. मात्र, भाजपच्या नागपुरातील 52 नगरसेविकांपैकी काही नगरसेविका जनतेपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे अशा महिला नगरसेविकांवर मतदार नाराज असल्याची माहिती आहे. ही बाब लक्षात घेऊन भाजप खबरदारी म्हणून अनेक नगरसेविकांचं तिकीट कापण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. प्रत्येक निवडणुकीत 30 टक्क्यांच्या आसपास तिकीट बदलली जातात. पक्ष नव्या चेहऱ्यांना संधी देतं. या निवडणुकीतही भाजपमधील 30 टक्के विद्यमान नगरसेवकांची तिकीटं कापली जातील. त्यात महिला नगरसेविकांचाही समावेश असेल, अशी मागणी महापालिकेतील भाजपचे नेते अविनाश ठाकरे यांनी दिलीय.

समाधानकारक कामगिरी नसलेल्या नगरसेवकांना नारळ

समाधानकारक कामगिरी नसलेल्या नगरसेवकांना भाजप वगळणार आहे, अशी माहिती अविनाश ठाकरे यांनी यापूर्वीही दिली होती. तसंच त्यांनी महापालिकेतील तीनच्या प्रभाग पद्धतीचं स्वागत केलं होतं.

प्रत्येक निवडणुकीत 10 ते 20 टक्के उमेदवारांचं तिकीट बदललं जातं. त्यात नवीन काही नाही. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जर मग नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची असेल तर निश्चित काही बदल करावे लागतात. कुणी नाराज होण्याचा प्रश्न नसतो, असंही त्यांनी सांगितलं होतं. ज्या नगरसेवकांची मागील 5 वर्षात समाधानकारक कामगिरी नसेल अशा 25 ते 30 टक्के नगरसेवकांना भाजप वगळणार आहे, असं ठाकरे यांनी सांगितलंय. त्यामुळे नागपुरातील भाजपच्या नगरसेवकांची धाकधूक वाढलीय.

भाजपचं मिशन नागपूर महानगरपालिका

नागपूर महानगरपालिकेत भाजपची सत्ता आहे. विधानपरिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नागपूरचे तत्कालीन महापौर आणि उमेदवार संदीप जोशी यांना पराभव स्वीकारावा लागला होता. त्या पराभवानंतर भाजप सतर्क झाल्याचं दिसून येत आहे. नागपूर महापालिका क्षेत्रात येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपच्या वतीनं तरुणांचे मेळावे आयोजित करण्यास सुरुवात झाली आहे. भाजपनं एक प्रकारे मिशन नागपूर महापालिका सुरु केलेय.

50 हजार तरुणांची फळी तयार करणार

भाजपच्या वतीनं प्रत्येक विधानसभा मतदारसंघात तरुणांचे मेळावे सुरु करण्यात आले आहेत. भाजप नागपूर जिल्ह्यात 50 हजार तरुणांची युवा वॅारियर्सची फळी तयार करणार आहे. एका बुथवर 25 तरुणांची फळी काम करेल. त्यादृष्टीनं भाजपची तयारी सुरु असल्याची माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.

नागपूर महापालिका पक्षीय बलाबल

एकूण सदस्य: 151

भाजप :108

काँग्रेस: 29

बसपा : 10

इतर :04

इतर बातम्या :

एसटीच्या 306 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू, तर 25 कर्मचाऱ्यांची आत्महत्या! परिवहन मंत्री वसुलीत गुंतले का? भाजपचा सवाल

VIDEO: स्टेडियमचं वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे, उदयनराजे भडकले; वाद काय वाचा

BJP is likely to cut the tickets of many existing women corporators