एसटीच्या 306 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू, तर 25 कर्मचाऱ्यांची आत्महत्या! परिवहन मंत्री वसुलीत गुंतले का? भाजपचा सवाल

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Oct 23, 2021 | 12:16 PM

एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अशावेळी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय.

एसटीच्या 306 कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू, तर 25 कर्मचाऱ्यांची आत्महत्या! परिवहन मंत्री वसुलीत गुंतले का? भाजपचा सवाल
अनिल परब, केशव उपाध्ये

मुंबई : प्रवाशांच्या सेवेसाठी या ब्रीदवाक्याला जागत महाराष्ट्रातील लाखो प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचं हत्यात उपसलं आहे. दिवाळीच्या तोंडावर राज्यातील एसटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी बेमुदत आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अशावेळी प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. (Keshav Upadhyay criticizes Transport Minister Anil Parab over ST workers’ question)

एसटी महामंडळाच्या 306 कर्मचाऱ्यांचा कोविड मध्ये मृत्यू 25 कर्मचाऱ्यांची आत्महत्या पण उद्धव ठाकरे सरकार मात्र थंड आहे. परिवहन मंत्री सध्या कोणत्या वसुलीत इतके गुंतलेत की, त्यांना ST कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला वेळ नाही? मुळात अनिल परब आहेत कुठे? आहेत असा सवाल उपाध्ये यांनी केलाय. त्याचबरोबर शिवसेनेत कदम विरुद्ध परब कोल्डवॉर सुरू असल्याने महाविकास आघाडीने परिवहन खातं रामभरोसे सोडलंय असं दिसतंय. मुख्यमंत्री एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड करणार का? आर्यनचे पाठीराखे व ड्रग्ज विरोधी मोहीमेवर टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मलिक या प्रश्नावर बोलणार नाहीत कारण सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, असा खोचक टोलाही उपाध्ये यांनी लगावलाय.

पगारवाढ, महागाई भत्ता वाढवून मिळावा

27 ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचे बेमुदत आमरण उपोषण सुरु होणार आहे. एसटीचे राज्यसरकारमध्ये विलगीकरण करावे, पगारवाढ त्याचबरोबर महागाई भत्त्यात वाढ मिळावी यासाठी आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिली. आंदोलनाचा तिढा वेळी सुटला नाहीतर ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.

एसटीचं राज्य सरकारमध्ये विलनीकरण करा

दररोज सुमारे 65 लाख लोकांना सुरक्षित सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना वेळेववर वेतन दिलं जात नाही. कोरोना काळात एसटीच्या 306 कर्मचाऱ्यांनी प्राणाची आहुती दिली. एसटी कर्मचाऱ्यांना एच आर वेळेवर मिळत नाही, डीए वेळेवर मिळत नाही. राज्यातील प्रत्येक संकटाच्या वेळी एसटी कर्मचारी पुढं असतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नी एक कृती समिती सर्व संघटनांनी मिळून स्थापन केलेली आहे.

इतर बातम्या :

VIDEO: स्टेडियमचं वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे, उदयनराजे भडकले; वाद काय वाचा

काँग्रेसचा उत्तराखंडातही पंजाब पॅटर्न?, दलित मुख्यमंत्री देणार?; हरीश रावत यांचं टेन्शन वाढलं

Keshav Upadhyay criticizes Transport Minister Anil Parab over ST workers’ question

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI