VIDEO: स्टेडियमचं वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे, उदयनराजे भडकले; वाद काय वाचा

सातारा क्रीडा संकुलावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले प्रचंड संतापले आहेत. साताऱ्यातील स्टेडियमचं वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे. (udayanraje bhosale reaction on satara stadium)

VIDEO: स्टेडियमचं वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे, उदयनराजे भडकले; वाद काय वाचा
उदयनराजे भोसले, खासदार, सातारा
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 11:52 AM

सातारा: सातारा क्रीडा संकुलावरून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले प्रचंड संतापले आहेत. साताऱ्यातील स्टेडियमचं वाट्टोळं करणाऱ्यांना मुस्काडलं पाहिजे, असा संताप उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला आहे. उदयनराजेंचा हा रोख उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.

खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा एसटी स्टँड नजीक काही वर्षांपूर्वी उभारलेल्या क्रीडा संकुलबाबत संतप्त अशी प्रतिक्रिया दिली आहे. चुकीच्या पद्धतीने हे संकुल उभे केले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याकाळी रणजी ट्रॉफी शाहू स्टेडियमवर भरवल्या जात होत्या. रणजीही झाल्या. तेव्हा ट्रॉफीची मॅचेस घेऊ शकलो असतो. सातारा प्राईम एरिया आहे. स्टँडच्या शेजारी आहे. एवढं असताना संकुल उभारलं गेलं नाही. बी. जी. शिर्केंनी बालेवाडीचं स्टेडियम कॉमन वेल्थसाठी बांधलं होतं. त्यांनी आपल्या संकुलासाठी निघालेल्या टेंडरसाठी फॉर्म भरला होता. हे का सांगतो, हे मीडियात आलं पाहिजे. हे आमदार, खासदार जी सो कॉल्ड माकडं आहेत ना, या सगळ्यांनी त्यातून बोध घ्यायला हवा. राजकारणापलिकडे जाऊन विचार करायला पाहिजे. स्पोर्ट्स आणि इतर ठिकाणी राजकारण आणू नये. इकडे वाट्टोळं करून टाकलं सर्वांचं, असा संताप उदयनराजेंनी व्यक्त केला.

स्टेडियमचं टेंडर काढलं होतं, व्यापारी संकुलाचं नाही

त्यावेळी पालकमंत्री होते इकडचे. त्यांनी या सर्वांवर उत्तर द्यावं. प्रत्येकवेळी मी नाही… मी नाही… मी काय केलं मी काय केलं… मुस्काडलं पाहिजे यांना…ऐन मोक्यावरची जागा कशी मिळणार? ज्यांनी बांधकाम केलं… आपण टेंडर काढलं होतं स्टेडियमचं. आपण काही व्यापारी संकुलाचं टेंडर काढलं नव्हतं, असंही ते म्हणाले. स्टेडियमचे टेंडर काढलेले असताना स्टेडियमच्या बाहेरून गाळे कसे बनवले? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

मराठा आरक्षणावरुन उदयनराजे आक्रमक

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच उदयनराजे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले होते. पक्ष-बिक्ष इथे आणू नका, मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा समाजाचा प्रश्न आहे. आधी राज्याचं बघा, केंद्राचं मी बघतो, अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्य सरकार आणि मराठा समाजातील नेत्यांना एकप्रकारे इशारा दिलाय. आज खासदार संभाजीराजे छत्रपती आणि खासदार उदयनराजे यांची 14 जून रोजी पुण्यात भेट झाली. यावेळी पत्रकारांशी बोलताना उदयनराजेंनी मराठा आरक्षणावरुन विविध पैलूंवर भाष्य केलं. मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवा. श्वेतपत्रिका काढा, अशी मागणीही त्यांनी केली होती.

पाच बोटं एकसारखे नसतात, सर्वांचे विचार वेगवेगळे असतात. माझे प्रिन्सिपल वेगळे आहेत, तुमचे वेगळे आहेत. मी कायदे बियदे मानत नाहीत, सुप्रीम कोर्टात कुणी गायकवाड अहवाल वाचलाच नाही, हे माझं ठाम मत आहे. गरिबांना वंचितांना शिक्षणापासून का दूर ठेवलं जात आहे. पक्ष-बिक्ष इथे आणू नका. मी जे बोलतोय ते सगळ्या पक्षांना लागू आहे. हा प्रश्न समाजाचा आहे. सामाजिक व्यवस्थेत फूट पाडण्याचा प्रयत्न होत आहे. राज्याने कायदा करावा. विशेष अधिवेशन बोलवा आणि कायदा करा. उद्धव ठाकरे, अजित पवार सोडा. सभागृहात एक आणि बाहेर एक असं बोलू नका, अशा शब्दात उदयनराजे भोसले यांनी राज्य सरकारला सुनावलं.

संबंधित बातम्या:

लढण्याआधीच पडले; लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचे अर्ज बाद

कर्जमुक्तीसाठी आवश्यक असलेले आधार प्रमाणीकरण म्हणजे नेमंक काय?

Drugs Case | आर्यनला ड्रग्ज पुरवले, पण कोणत्याही पेडलरच्या संपर्कात नाही! अनन्या पांडेची NCB समोर कबुली

(udayanraje bhosale reaction on satara stadium)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.