NMC Election 2022 (Ward 41) | प्रभाग क्रमांक 41 या नव्या प्रभागात विजयाची माळ कोणाच्या गळात पडणार?, वाचा सविस्तरपणे!
नवीन प्रभाग असल्याने इच्छुकांसाठी ही चांगली संधी आहे. प्रभाग क्रमांक 41 मध्ये आपल्यालाच भाजपाचे तिकिट मिळाले यासाठी अनेकांनी वशिले देखील लावले आहे. नागपूर शहर आणि महापालिकेमध्ये भाजपाचे वर्चस्व असल्याने सर्वांनाच निवडून येण्यासाठी भाजपाचे तिकिट हवे आहे.

नागपूर : राज्यातील अनेक महापालिकेच्या निवडणूका (Election) तोंडावर आल्या आहेत. राज्यातील सत्ता संघर्षानंतर स्थानिक पातळीवरील या निवडणूका महत्वाच्या ठरणार आहेत. राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाने सत्तास्थापन केलीयं. यामुळे नागपूर महापालिकेमध्ये देखील ही युती कायम असेल की, स्वतंत्रपणे निवडणूका लढल्या जातील हे बघण्यासारखे ठरणार आहे. नागपूर महापालिकेवर (Nagpur Municipal Corporation) भाजपाची सत्ता आहे. अगोदर नागपूर महापालिकेत 38 प्रभाग होते. मात्र, यंदा यामध्ये मोठे बदल करून 52 तयार करण्यात आले आहेत. यामुळे अनेकांसाठी ही एक सुवर्णसंधीच म्हणाली लागणार आहे. नव्या प्रभागात आपले नशीब आजमवण्यासाठी अनेकजण तयारीलाही लागल्याची चित्र आहे. नागपूर महापालिकेच्या प्रभाग (Ward) क्रमांक 41 मध्ये अनेकांनी नगरसेवक होण्यासाठी कंबर कसली आहे. प्रभागाचे नेमके गणित काय आहे? याबद्दल आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
| भाजपा | ||||
|---|---|---|---|---|
| शिवसेना | ||||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
| काँग्रेस | ||||
| अपक्ष |
प्रभाग क्रमांक 41 ची लोकसंख्या 47412
प्रभाग क्रमांक 41 ची लोकसंख्या 47412 आहे. खामला, नेल्को सोसायटी, अत्रे लेआउट, एफसीएचएस लेआऊट 4, सेंट्रल एक्साईज कॉलनी, स्नेहनगर, विवेकानंदनगर, विकासनगर, सावरकरनगर. व्यंकटेशनगर, शिवनगर तर उत्तरेकडे रिंगरोडवरील पडोळे हॉस्पीटल चौकापासून पूर्वेकडे जाणारा रिंगरोड खामला चौकापर्यंत, नंतर पुढे उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्याने आरपीटीएस टी-पॉइंट पर्यंत. नंतर पुढे पूर्वेकडे जाणाऱ्या रस्त्याने अजनी चौकापर्यंत प्रभाग आहे.
| भाजपा | ||||
|---|---|---|---|---|
| शिवसेना | ||||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
| काँग्रेस | ||||
| अपक्ष |
अजनी चौकापासून दक्षिणेकडे वर्धा रोडपर्यंत प्रभाग
अजनी चौकापासून दक्षिणेकडे वर्धा रोडने छत्रपती चौकापर्यंतनंतर पुढे त्याच रस्त्याने जयप्रकाश नगर चौकापर्यंत आहे तर दक्षिणकडे वर्धा रोडवरील जयप्रकाशनगर चौकापासून पश्चिमेकडे जाणाऱ्या लंडन स्ट्रीट रस्त्याने मेंडे लेआऊट येथील पडोळे हॉस्पीटल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे टी-पॉईट पर्यंत, तर पश्चिमकडे लंडन स्ट्रीट रस्त्यावरील पडाळे हॉस्पीटल चौकाकडे जाणाऱ्या रस्त्याचे टी-पॉइंटपासून उत्तरेकडे जाणाऱ्या रस्त्याने रिंगरोडवरील पडोळे हॉस्पीटल चौकापर्यंत आहे.
| भाजपा | ||||
|---|---|---|---|---|
| शिवसेना | ||||
| राष्ट्रवादी काँग्रेस | ||||
| काँग्रेस | ||||
| अपक्ष |
इच्छुकांसाठी ही चांगली संधी
नवीन प्रभाग असल्याने इच्छुकांसाठी ही चांगली संधी आहे. प्रभाग क्रमांक 41 मध्ये आपल्यालाच भाजपाचे तिकिट मिळाले यासाठी अनेकांनी वशिले देखील लावले आहे. नागपूर शहर आणि महापालिकेमध्ये भाजपाचे वर्चस्व असल्याने सर्वांनाच निवडून येण्यासाठी भाजपाचे तिकिट हवे आहे. मात्र, जर पक्षाने तिकिट दिले नाही तर अपक्ष निवडून येण्याची तयारी देखील अनेकांनी केलीयं. यामुळे या नव्या प्रभागामधील निवडणुक चुरशीची होणार हे नक्कीच आहे. भाजपाने देखील नवे प्रभाग आपलेच बालेकिल्ले तयार करण्यासाठी अनेक योजना आखल्या आहेत.
