AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NMC election 2022 : वाढवलेल्या प्रभाग क्रमांक 50मध्ये कुणाचं वर्चस्व राहणार? नागपूर महापालिकेतल्या राजकीय पक्षांत रस्सीखेच

मागील वेळी 38 प्रभाग होते. यावेळी 52 प्रभाग असणार आहेत. त्यामुळे वाढलेल्या प्रभागात कोणता पक्ष बाजी मारतो, याती उत्सुकता आहे. सध्या प्रभागांची संख्या 52 पर्यंत वाढवण्यात आली असून तीन सदस्यीय प्रभागांना समोर ठेवून प्रशासनाने तयारी पूर्ण केली.

NMC election 2022 : वाढवलेल्या प्रभाग क्रमांक 50मध्ये कुणाचं वर्चस्व राहणार? नागपूर महापालिकेतल्या राजकीय पक्षांत रस्सीखेच
नागपूर महापालिका, वॉर्ड 50Image Credit source: tv9
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Aug 08, 2022 | 9:15 AM
Share

नागपूर : नागपूर महापालिका (NMC election 2022) यावेळी कोणाची होणार, हा प्रश्न सध्या नागपूर राजकीय विश्वात चर्चिला जात आहे. मागील वेळी भाजपाने याठिकाणी सत्ता स्थापन केली होती. यावेळी राजकीय गणिते बदलली आहेत. राज्यस्तरावर शिवसेनेत पडलेली फूट स्थानिक पातळीवर परिणाम करेल का, शिवसेनेची सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत (Congress NCP) आघाडी आहे. ती आघाडी महापालिकेलाही होणार का, प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढणार का, अशा विविध प्रश्नांची उत्तरे लवकरच मिळणार आहेत. तर या सर्वांचा भाजपावर (Nagpur BJP) किती परिणाम होतो, हे निकालानंतर समजणार आहे. मागील वेळी चार सदस्यीय प्रभाग रचना होती. यावेळी ती तीन सदस्यीय करण्यात आली आहे. तर 151 जागांसाठी 52 प्रभागांत मतदान होणार आहे. मागील वेळी 38 प्रभाग होते. ते यावेळी 52पर्यंत वाढवण्यात आले आहेत.

प्रभागातील व्याप्ती कशी?

प्रभाग 50ची इंद्रनगर, स्वागतनगर, श्रीमहालक्ष्मी नगर, साईनगर, नरसाळा, न्यू नरसाळा, गणेशधाम, हुडकेश्वर, चंद्रकिरणनगर, संतोषीनगर, दुबेनगर, सरस्वतीनगर, इंगोलेनगर, श्यामनगर, पिपळा फाटा, संभाजीनगर, सुदर्शननगर, सावरबांधे लेआऊट, निळकंठनगर अशी व्याप्ती आहे. तर विठ्ठल नगर, मदन रतन कॉम्प्लेक्स, लालजी दुबे कॅटरर्स, साईराम किराणा स्टोअर्स, धार्मिक हार्डवेअर, कॅलिबर्स किड्स शाळा, जयराम टेलिकॉम आणि किराणा स्टोअर्स आदी ठिकाणे आणि सीमा आहेत.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग क्रमांक 50मधील एकूण लोकसंख्या 45,581 आहे. यात अनुसूचित जातीची एकूण संख्या 5687 असून अनुसूचित जमातीची एकूण लोकसंख्या 3266 इतकी आहे. 2011नंतर जनगणना झालेली नाही. कोविडकाळामुळे जनगणना अद्यापही झालेली नाही. ती पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे आधीच्याच लोकसंख्येत वाढलेली संख्या गृहीत धरण्यात आलेली आहे.

कोण मारणार बाजी?

मागील वेळी 38 प्रभाग होते. यावेळी 52 प्रभाग असणार आहेत. त्यामुळे वाढलेल्या प्रभागात कोणता पक्ष बाजी मारतो, याती उत्सुकता आहे. सध्या प्रभागांची संख्या 52 पर्यंत वाढवण्यात आली असून तीन सदस्यीय प्रभागांना समोर ठेवून प्रशासनाने तयारी पूर्ण केली. मात्र आता हे प्रभाग परत चार सदस्यीय होणार की आहे त्याच पद्धतीने निवडणुका घेतल्या जाणार, हेदेखील लवकरच समजणार आहे.

प्रभाग क्र. 50 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्र. 50 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग क्र. 50 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

आरक्षण कसे?

प्रभागाचे आरक्षण यावेळी बदलेले आहे. तर प्रभाग क्रमांक 50 हा नव्याने तयार करण्यात आला आहे. यानुसार 49 अ हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. तर ब आणि क हा सर्वसाधारण उमेदवारासाठी यावेळी राखीव ठेवण्यात आलेला आहे.

Follow Us
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी
नाशिकचे खासदार एकनिष्ठ राहिले, मात्र... ठाकरेंच्या नगरसेवकांबाबत मोठी अपडेट समोर
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो,
मोठी बातमी! शिंदे गटाकडून अटोकाट प्रयत्न, पण ऐनवेळी ऑपरेशन टायगरला खो, नाशिकमधून मोठी माहिती समोर!
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा
आता काही खरं नाही! कोर्टाच्या 'त्या' निकालाने वाढवलं टेन्शन, गिरजा राऊत प्रकरणी सर्वात मोठी अपडेट
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा Video
बैठक ठाकरे गटाची कौतुक मात्र भाजप नेत्याचं; दोन बड्या नेत्यांचा व्हिडीओ व्हायरल होताच चर्चांना उधाण
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ...
महाराष्ट्र दिल्लीच्या तख्तापासून अजूनही लांब, म्हणून आता देवाभाऊ... भर मंचावरून दत्ता भरणेंचं मोठं विधान
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... CM फडणवीस
शेतकऱ्यांना खुशखबर, तब्बल 48 हजार कोटींचं विज बिल... मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी घोषणा
कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेन
Video | कोस्टल रोडवर भीषण अपघात! प्रचंड धूर... एका पाठोपाठ एक गाड्या उलट दिशेने... पहा व्हिडीओ
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात
हे तुम्हाला CCTVमध्ये... शिंदेंच्या दालनातील शरद पवारांच्या बैठकीबबात सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत
डिलिमिटेशन बिलाबाबात मोठा ट्विस्ट! सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत सांगितली पक्षाची भूमिका?
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट
आषाढी वारी पंढरपूरात येण्याआधी मोठा बदल; पंढरपुर देवस्थानाचा थेट निर्णय, आतापासून...
तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट….

तुकाराम मुंडे यांचा सिया गोयलच्या वडिलांना दणका; पुण्यातील दुकानावर FDA ची मोठी कारवाई, थेट…

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट….

मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांनी फोडला मोठा बॉम्ब, एका घोषणेनं जगभरात मोठी खळबळ, यादीत भारताचाही समावेश, आता थेट…

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं.

पंढरपुरात व्हिआपी दर्शनावरून दुजाभाव? शिवसेना नेत्यासोबत आलेल्या लोकांना थेट दर्शन तर भाजप नेत्याच्या कुटुंबाला ताटकळत ठेवलं

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!.

मुस्लीम देश पाकिस्तानात फक्त हिंदूंचाच बोलबाला, या शहरात जिकडे तिकडे फक्त हिंदूच!

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी.

अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे इराणमध्ये खळबळ! मृतांचा आकडा आला समोर, शेकडो जखमी