वरुण सरदेसाईंच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेचे नांदेडवासियांना गिफ्ट

नांदेड शहरात रुग्णवाहिकांची संख्या अपुरी पडत असल्याने युवासेनेने अ‍ॅम्ब्युलन्स समाजसेवेसाठी उपलब्ध करुन दिली आहे.

वरुण सरदेसाईंच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेचे नांदेडवासियांना गिफ्ट

नांदेड : युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त (23 सप्टेंबर) नांदेडवासियांना अनोखं गिफ्ट मिळालं आहे. नांदेडमध्ये युवासेनेच्या वतीने अ‍ॅम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आले. (Nanded Yuvasena gifts Ambulance on the occasion of Varun Sardesai’s birthday)

कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नांदेड शहरात रुग्णवाहिकांची संख्या अपुरी पडत असल्याने युवासेनेने अ‍ॅम्ब्युलन्स समाजसेवेसाठी उपलब्ध करुन दिली आहे. युवासेनेचे नेते वरुण सरदेसाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनसेवेसाठी ही अ‍ॅम्ब्युलन्स आजपासून शहरात सेवा देणार आहे.

केवळ इंधनाचा खर्च रुग्णांकडून घेण्यात येणार आहे, तर गर्भवती महिलांना मोफत सेवा देणार असल्याचे युवासेनेचे जिल्हाध्यक्ष माधव पावडे यांनी सांगितलं. अ‍ॅम्ब्युलन्सची कमतरता असल्यामुळे नांदेडमध्ये खाजगी रुग्णवाहिका मनमानी भाड्याची मागणी करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, या पार्श्वभूमीवर नांदेड युवासेनेच्या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

कोण आहेत वरुण सरदेसाई?

वरुण सतीश सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या भगिनीचे पुत्र. (Nanded Yuvasena gifts Ambulance on the occasion of Varun Sardesai’s birthday)

विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या मिसेस मुख्यमंत्री अर्थात रश्मी ठाकरे यांचाही आज (23 सप्टेंबर) वाढदिवस. त्यामुळे मावशी-भाच्याच्या वाढदिवसाचा एकत्रच योग असल्याचे दिसत आहे.

वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे, तसंच वरुण यांच्याकडे शिवसेनेच्या आयटी सेलचीही जबाबदारी आहे. सरदेसाईंनी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली आहे.

आदित्य ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी जाहीररित्या सर्वप्रथम मागणी वरुण यांनीच केली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळी वरुण सरदेसाई हे शिवसेनेचे स्टार प्रचारक होते. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनात वरुण सरदेसाई यांचा मोठा सहभाग होता.

गेल्या वेळी मुंबई सिनेट निवडणुकीच्या युवासेनेच्या व्यूहरचनेत वरुण सरदेसाई यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सर्व 10 जागा जिंकून युवासेनेने विक्रम रचला होता.

2017 मधील कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीतही त्यांनी महत्त्वाची जबाबदारी पेलली होती. 2014 मधील लोकसभा निवडणुकीत श्रीकांत शिंदेंसाठी त्यांनी प्रचार केला होता. विशेष म्हणजे वरुण सरदेसाई गेल्या वेळी विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यताही वर्तवली जात होती.

संबंधित बातम्या :

Happy Birthday Rashmi Thackeray | ‘मातोश्री’च्या सूनबाई ते मिसेस मुख्यमंत्री, रश्मी ठाकरेंचा प्रवास

(Nanded Yuvasena gifts Ambulance on the occasion of Varun Sardesai’s birthday)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *