नंदूरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जाहीर, मतदान आणि निकाल कधी? वाचा एका क्लिकवर

राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिचीच्या निवडणुका घोषित केल्या आहेत.

नंदूरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक जाहीर, मतदान आणि निकाल कधी? वाचा एका क्लिकवर
Voting
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jun 23, 2021 | 5:15 PM

नंदूरबार : राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार नंदुरबार जिल्हा परिषद आणि पंचायत समिचीच्या निवडणुका घोषित केल्या आहेत. या अंतर्गत जिल्हा 11 निवडणूक विभाग आणि शहादा, नंदुरबार व अक्कलकुवा पंचायत समितीच्या एकूण 14 निवडणूक गणांसाठी पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सोमवार 19 जुलै 2021 रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5-30 या वेळेत मतदान होईल तर 20 जुलै 2021 रोजी सकाळी 10 पासुन मतमोजणी होईल (Nandurbar ZP and Panchayat Samiti Election 2021 timetable by Election commission).

सर्वोच्च न्यायालाने 4 मार्च 2021 रोजीच्या निर्णयानुसार नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गाच्या जागांवर झालेल्या निवडणूका तात्काळ प्रभावाने रद्दबादल ठरवून रिक्त झालेल्या सर्व जागा सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्याबाबत दोन आठवड्याच्या आत निवडणूक प्रक्रिया आरंभ करण्याचे आदेश आयोगाला दिले होते. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने हा पोटनिवडणुक कार्यक्रम जाहीर केला आहे.

जिल्हा परिषदेसाठी कोठे निवडणूक?

नंदुरबार जिल्हा परिषदेअंतर्गत 8- खापर, 9- अक्कलकुवा,24-म्हसावद, 29-लोणखेडा, 31- पाडळदे बु, 35-कहाटुळ, 38-कोळदे, 39-खोंडामळी, 40-कोपर्ली, 41-रनाळा, 42-मांडळ या 11 निवडणूक विभागासाठी आणि पंचायत समितीअंतर्गत 16-कोराई, 49-सुलतानपूर, 51-खेडदिगर, 53-मंदाणे, 58-डोंगरगांव, 59-मोहिदे तह, 61-जावेद तजो, 62-पाडळदे ब्रु, 66-शेल्टी, 73-गुजरभवाली, 74-पातोंडा, 76-होळ तर्फे हवेली, 85-नांदर्खे आणि 87-गुजरजांभोली या 14 गणासाठी पोट निवडणूक होणार आहे.

अर्जपासून मतदानापर्यंतचं वेळापत्रक काय?

निवडणुकीच्या तारखांची सूचना व निवडणुकीचा कार्यक्रम मंगळवार 29 जून 2021 रोजी रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. संकेतस्थळावर भरण्यात आलेल्या नामनिर्देशनपत्र स्विकारण्याचा कालावधी मंगळवार 29 जून 2021 ते सोमवार 5 जुलै 2021 (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत) असेल. मंगळवार 6 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजल्यापासून नामनिर्देशनपत्राची छाननी करण्यात येऊन त्यावर निर्णय देण्यात येईल आणि छाननीनंतर लगेचच वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

नामनिर्देशनपत्राचा स्विकार करण्याबाबत किंवा ते नामंजूर करण्याबाबतचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायाधिशांकडे अपिल करण्याची शेवटची तारीख शुक्रवार 9 जुलै 2021 असेल.
जिल्हा न्यायाधिशांनी अपिलावर सुनावणी व निकाल देण्याची संभाव्य शेवटची तारीख सोमवार 12 जुलै 2021 राहील, तर अपिल निकालात काढल्यावर वैध उमेदवारांची यादी याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. जेथे अपील नाही तेथे उमेदवार मागे घेण्याची तारीख सोमवार 12 जुलै 2021 (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत ) आणि जेथे अपील आहे तेथे उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख बुधवार 14 जुलै 2021 (सकाळी 11 ते दुपारी 3 पर्यंत ) राहील.

अपील नसलेल्या ठिकाणी सोमवार 12 जुलै 2021 रोजी तर जेथे अपिल आहे तेथे बुधवार 14 जुलै 2021 रोजी (दुपारी 3.30 नंतर ) निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्धी व निशाणी वाटप होईल. सोमवार 19 जुलै 2021 रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5-30 या वेळेत मतदान होईल. मंगळवार 20 जुलै 2021 रोजी सकाळी 10 पासून मतमोजणीस सुरूवात होईल. शुक्रवार 23 जुलै 2021 रोजी निवडून आलेल्या सदस्यांची नावे प्रसिद्ध करण्यात येईल.

जिल्ह्यात आचारसंहिता लागू

निवडणुकीची आचारसंहिता मंगळवारपासून लागू झाली असून ती निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील. या निवडणुकीकरिता आचारसंहिता जरी संबंधित मतदार संघात लागू झालेली असली तरी पोट निवडणुक असलेल्या निवडणूक विभाग किंवा निर्वाचक गणातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशा तऱ्हेचे कोणतेही धोरणात्मक निर्णय, कोणतीही कृती, घोषणा संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, मंत्रीमंडळातील सदस्य, खासदार, आमदार अथवा कोणत्याही पदाधिकाऱ्यांना करता येणार नाही. मतदानाच्यावेळी मतदार कर्मचारी तसेच मतदारांनी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करणे आवश्यक राहील. असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी कळविले आहे.

किती जिल्हा परिषद जागांसाठी मतदान होतंय?

धुळे –  15
नंदूरबार – 11
अकोला – 14
वाशिम – 14
नागपूर – 16

नेमक्या किती पंचायत समिती जागांसाठी मतदान?

धुळे – 30
नंदूरबार – 14
अकोला – 28
वाशिम – 27
नागपूर – 31

हेही वाचा :

वाशिम जिल्हा परिषदेचा अखेर बिगूल वाजला, अर्ज भरण्यापासून निकालापर्यंतची माहिती फक्त एका क्लिकवर

नंदुरबार ZP सत्तेचा तिढा सोडवण्यासाठी संजय राऊत मैदानात

व्हिडीओ पाहा :

Nandurbar ZP and Panchayat Samiti Election 2021 timetable by Election commission

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें