मी केंद्रात कॅबिनेट मंत्री व्हाया देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंनी मंत्रिपदाचं सिक्रेट सांगताच फडणवीसांनी जोडले हात

| Updated on: Dec 06, 2021 | 2:31 PM

माझा उल्लेख मी केंद्रात मंत्री आहे असा होतो, पण व्हाया देवेंद्र फडणवीस असा आहे. दिल्लीत जा असा आदेश यांनी दिला. आम्ही आदेश पाळतो, असं नारायण राणे म्हणाले.

मी केंद्रात कॅबिनेट मंत्री व्हाया देवेंद्र फडणवीस, नारायण राणेंनी मंत्रिपदाचं सिक्रेट सांगताच फडणवीसांनी जोडले हात
देवेंद्र फडणवीस नारायण राणे
Follow us on

पुणे: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) पुण्यातील सिंम्बॉयसिस संस्थेच्या संग्रहालय आणि स्मारक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभेला उपस्थित होते. यावेळी नारायण राणे यांनी माझा उल्लेख मी केंद्रात कॅबिनेट मंत्री आहे असा होतो, पण व्हाया देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis)असा आहे. दिल्लीत जा असा आदेश त्यांनी दिला. आम्ही आदेश पाळतो. दिल्लीत आता मी सुखी आहे. महिन्याला पुण्यात येणार माणूस चार महिन्यांनी पुण्यात आला, तुमच्या माझ्यातल अंतर यांनी वाढवलं याला कारणीभूत देवेंद्र फडणवीस आहेत, असं नारायण राणे म्हणाले. हातातलं घड्याळ बीजेपीचं (BJP) नाही, राष्ट्रवादीच आहे, त्यामुळे आता थांबायला हवं, पुढे कार्यक्रम आहेत, असं नारायण राणे म्हणाले.

आजचा दिवस कर्तव्याची जाणीव करुन देणारा

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो, असं नारायण राणे म्हणाले. आजचा दिवस हा महत्वाचा आहे, हा कार्यक्रम भावनिक आहे, कर्तव्याची जाणीव करुन देणारा आहे. अनेक जण असे म्युझियम बनवतात, बाबासाहेब यांचं नाव सांगून, अनेक गोष्टी तिथं ठेवतात पण त्या सगळ्या खऱ्या असतात असं नाही, पण इथल्या म्युझियम मधल्या वस्तू खऱ्या आहेत. डॉ. बाबासाहेब इथं जन्माला आले याचा अभिमान वाटतो. आज देशाला बाबासाहेबांसारख्या नागरिकांची गरज आहे, असं नारायण राणे म्हणाले

आपण बाबासाहेब आंबेडकरांचा गुण आत्मसात केल्यास महासत्ता होऊ

बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यात जे काम केलं, घटना लिहिलं त्या घटनेच कौतुक सगळीकडे होतय. मराठा आरक्षणाबद्दल खुप आंदोलन झाली, विरोधकांनीही खुप टीका केली, म्हणे हे आरक्षण घटनेत बसत नाही. मग तज्ञांनी उत्तर दिलं घटनेच्या कलम 15 /4 प्रमाणे आरक्षण देण्याचा राज्य सरकारला अधिकार आहेत बाबासाहेबांच्या विचारांच अनुकरण करा, असं नारायण राणे म्हणाले. आत्मनिर्भर होण्यासाठी बाबासाहेबांचे विचार आवश्यक आहे. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक एक गुण आत्मसात केला तर अमेरिका आणि चीननंतर आपला देश महासत्ता होणार असल्याचं नारायण राणे म्हणाले.

इतर बातम्या:

Narayan Rane | कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस, नारायण राणेंकडून महामानवाला अभिवादन

Nitin Patil | शिवेंद्रराजेंना धक्का, नितीन पाटलांच्या पारड्यात शरद पवारांचं मत, सातारा जिल्हा बँक अध्यक्षपदी वर्णी

 

Narayan Rane said he is Union Cabinet Minister because of Devenndra Fadnavis