कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का?, नारायण राणेंचा सवाल

देशातील सर्वात जास्त 43 हजार रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का?, असा सवाल भाजप खासदार नारायण राणेंनी केला आहे. (Narayan Rane said Uddhav Thackeray should be take responsibility of major corona deaths in Maharashtra)

कोरोनामुळं सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्रात, ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही का?, नारायण राणेंचा सवाल
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 4:26 PM

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यातील भाषणात राज्यात केलेल्या कोणत्याही कामाचा उल्लेख नाही. ना शेतकऱ्याचा उल्लेख ना, राज्याच्या आर्थिक स्थितीबद्दल ते बोलले नाही. कोरोनावर तर ते बोलले नाहीत. कोरोनामुळे  देशातील सर्वात जास्त 43 हजार रुग्णांचा मृत्यू महाराष्ट्रात झाला. इतके रुग्ण मृत्यूमुखी पडले. याची जबबादारी मुख्यमंत्र्यांची नाही का?, असा सवाल भाजप खासदार नारायण राणेंनी केला आहे. (Narayan Rane said Uddhav Thackeray should be take responsibility of major corona deaths in Maharashtra)

नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादानं शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले. मोदींच्या नावानं मत मागितली म्हणून 56 आमदार निवडून आले, त्यांचे नाव घेतले नसते तर सेनेचे 25 आमदार देखील निवडून आले नसते. हिंदुत्वाला मुठमाती देऊन उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपद मिळवलं, अशी टीका नारायण राणेंनी केला.

आजची पत्रकार परिषद दसऱ्याच्या निमित्ताने 47 शिवसैनिकांमध्ये झालेल्या भव्य सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जे भाषण केलं त्याला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद घेतोय, असं नारायण राणे म्हणाले. मी आतापर्यंत पाहिलेले जे जे मुख्यमंत्री झाले त्यांनी आपल्या भाषणाने शैलीने विचाराने आणि कामाने आपली आणि महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवली. मात्र,आत्ताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कालच्या भाषणात कसलाही ताळमेळ नव्हता, शिवराळ भाषेत ते बरळले आहेत.

उद्धव ठाकरे यांनी सीबीआयबद्दल स्वतःच आदित्य ठाकरे यांना क्लिन चीट दिली. सुशांतची आत्महत्या नाही, तो खून आहे. आरोपी आज ना उद्या गजाआड जातील. त्यात त्यांचा पूत्र आदित्य ठाकरे तुरुंगात जाईल. आज मी स्पष्ट बोलतो. ते सत्तेचा दुरुपयोग करुन मुलाला वाचवत आहेत. सुशांतच्या प्रकरणातील सत्य लवकरच बाहेर येईल. त्याला कुणी मारलं आणि दिशाचा बलात्कार कुणी केला, तिला वरुन खाली कोणी टाकलं हे सर्व बाहेर येईल. या माणसाने त्याच्या आयुष्यात काहीही केलेलं नाही. इतरांच्या मदतीनेच कामं केली.

मराठा समाजाला उद्धव ठाकरे आरक्षण देणार नाहीत. त्यांना मराठा समाजाबाबत द्वेष आहे. धनगर समाजाला आरक्षण देऊन दाखवावे, असं आव्हान नारायण राणेंनी दिले आहे.

संबंधित बातम्या :

खूर्ची शाबूत ठेवण्यासाठी आटापिटा, बाळासाहेबांच्या नावाने अजून किती दिवस पोळ्या भाजणार? : चंद्रकांत पाटील

Narayan Rane LIVE | उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदी राहण्याची लायकी नाही, नारायण राणेंचा हल्लाबोल

(Narayan Rane said Uddhav Thackeray should be take responsibility of major corona deaths in Maharashtra)

Non Stop LIVE Update
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात
जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा दादांवर घणाघात.
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस
48 तासात उत्तर द्या, अन्यथा... निवडणूक अधिकाऱ्याकडून पुन्हा नोटीस.
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई
भांडूपमध्ये मध्यरात्री कोट्यवधींची रोकड सापडली, भरारी पथकाची कारवाई.
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री
मला शरम वाटली असती, असे म्हणत अजितदादांकडून सुप्रिया सुळेंची मिमिक्री.