ठाकरे सरकार नाही महाराष्ट्र सरकार, नारायण राणेंचा तिळपापड

ठाकरे सरकारच्या पहिल्या अधिवेशनाबद्दल त्यांना विचारलं असता नारायण राणेंनी 'ठाकरे सरकार' या शब्दाला आक्षेप घेतला.

ठाकरे सरकार नाही महाराष्ट्र सरकार, नारायण राणेंचा तिळपापड

नागपूर : ‘ठाकरे सरकार नाही, महाराष्ट्र सरकार म्हणा’ अशा शब्दात भाजप खासदार नारायण राणे यांनी ‘ठाकरे सरकार’ शब्दाला आक्षेप घेतला. नव्या सरकारचं अधिशवेशन हे अधिवेशन नाही, एखादा घरगुती कार्यक्रम वाटतो, असा टोला राणेंनी (Narayan Rane on Thackeray Government) लगावला.

शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडी सरकारचं पहिलंच अधिवेशन नागपुरात सुरु आहे. त्यावेळी नारायण राणेसुद्धा अधिवेशनस्थळी पोहचले. राणेंना विधीमंडळ परिसरात पाहून पत्रकारांनी गर्दी केली. ठाकरे सरकारच्या पहिल्या अधिवेशनाबद्दल त्यांना विचारलं असता नारायण राणेंनी ‘ठाकरे सरकार’ या शब्दाला आक्षेप घेतला.

‘हे महाराष्ट्र सरकारचं अधिवेशन आहे. कोणाचंही नाव त्याला जोडू नका,’ असं नारायण राणे म्हणाले. ‘हे अधिवशेन असल्याचं वाटतच नाही. सगळं कसं घरगुती वाटतं. सत्ताधाऱ्यांकडून कुठलीही गोष्ट नियमाला धरुन होत नाही, अशी टीकाही राणेंनी केली.

हेही वाचा : सर्व आमदारांचं एकत्र फोटोसेशन, फडणवीसांची दांडी, नाना पटोले म्हणाले, आमदारांची झोप झाली नसेल!

सरकारची कामगिरी कशी वाटते, असं विचारलं असता, नेमकं काय चाललंय याची माहिती घेऊन बोलेन, असं उत्तर नारायण राणेंनी दिलं. नारायण राणे दुपारी पत्रकार परिषद घेऊन काय बोलतात याबाबत उत्सुकता आहे.

याआधी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाही भाजप सरकारला फडणवीस सरकार संबोधलं जात होतं. त्यानुसार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकारला ‘ठाकरे सरकार’ म्हटलं जातं. Narayan Rane on Thackeray Government

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI