AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बॉय का? मिलिंद नार्वेकरांनी उत्तर देताना थेट नारायण राणेंच्या मेमरीची घंटी वाजवली !

पत्रकारांनी राऊतांच्या पत्रकार परिषदेतील शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राणेंनी मिलिंद नार्वेकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मिलिंद नार्वेकर हे मातोश्रीवर बॉयचं काम करत होते, असा खुलासाच राणेंनी केला. राणेंच्या या खोचक टीकेला आता मिलिंद नार्वेकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मिलिंद नार्वेकरांनी राणेंना त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या परवानगीबाबत किती वेळा फोन केला होता याची आठवणच करुन दिलीय.

बॉय का? मिलिंद नार्वेकरांनी उत्तर देताना थेट नारायण राणेंच्या मेमरीची घंटी वाजवली !
मिलिंद नार्वेकर, नारायण राणे
| Edited By: | Updated on: Feb 16, 2022 | 7:08 PM
Share

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी राणेंनी अगदी शेलक्या शब्दात राऊतांचा समाचार घेतला. तसंच राऊतांनी केलेल्या भाजप नेत्यांवरील आरोपांनाही राणेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. इतकंच नाही तर पत्रकारांनी राऊतांच्या पत्रकार परिषदेतील शिवसेनेच्या महत्वाच्या नेत्यांच्या अनुपस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना राणेंनी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. मिलिंद नार्वेकर हे मातोश्रीवर बॉयचं काम करत होते, असा खुलासाच राणेंनी केला. राणेंच्या या खोचक टीकेला आता मिलिंद नार्वेकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मिलिंद नार्वेकरांनी राणेंना त्यांच्या मेडिकल कॉलेजच्या परवानगीबाबत किती वेळा फोन केला होता याची आठवणच करुन दिलीय.

नारायण राणेंकडून नार्वेकरांवर खोचक टीका

संजय राऊत यांच्या मंगळवारच्या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, एकनाथ शिंदे हे नेते उपस्थित नव्हते. त्याबाबत पत्रकारांनी विचारलं असता, कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो… माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली.

नार्वेकरांनी राणेंच्या मेमरीची घंटी वाजवली!

तर राणेंच्या या टीकेला आता मिलिंद नार्वेकर यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मिलिंद नार्वेकर यांनी ट्वीट करुन राणेंना आपल्या मेडिकल कॉलेजच्या परवानगीसाठी किती वेळा फोन केले, याची आठवणच करुन दिली आहे. ‘बॉय का? अच्छा! स्वत:च्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करुन विनंत्या केल्याचं विसरलात? वाजला का नाही तुमच्या मेमरीची घंटी?’ असा खोचक सवाल नार्वेकर यांनी राणेंना केलाय.

मिलिंद नार्वेकरांचा शिवसेना प्रवेश कसा झाला?

दरम्यान, मिलिंद नार्वेकर शिवसेना सचिव पदापर्यंत कसे पोहोचले याची उत्सुकता अनेकांना आहे. मात्र, याचं उत्तर खुद्द मिलिंद नार्वेकरांनीच एक ट्वीटद्वारे दिलं होतं. 26 जुलै अर्थात उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला मिलिंद नार्वेकरांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतचा एक फोटो ट्वीट करुन आपल्या शिवसेना प्रवेशाची माहिती दिली होती. ‘सप्टेंबर १९९४ चा नेहमीसारखाच एक दिवस… एक तरुण उद्धवसाहेब ठाकरे यांना भेटला. म्हणाला मला शाखप्रमुख बनायचं आहे. साहेब म्हणाले, “शाखाप्रमुख बनायचं आहे की पक्ष देईल ती जबाबदारी घ्यायची आहे?” उद्धवसाहेबांचा शब्द प्रमाण मानून ते देतील ती जबाबदारी घेण्यासाठी तो तरुण तयार झाला. तेव्हापासून उद्धवसाहेबांनी मार्गदर्शन करत, नवे विचार देत, कौतुकाचे बोल आणि प्रसंगी कानउघडणी करत त्या तरुणाप्रमाणे अनेकांच्या आयुष्याला सुयोग्य दिशा दिली. आमच्या या मार्गदर्शकाला, प्रेरणा स्थानाला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा’, असं ट्वीट मिलिंद नार्वेकर यांनी केलं होतं.

इतर बातम्या : 

Narayan Rane Press Conference : ‘ईडीवर बोलू नको, बीडी प्यायला लावतील’, राणेंच्या वक्तव्यावर गंभीर वातावरणही मोकळं झालं

राऊत आणि शिवसेना नेतृत्वावरही दबाव, पत्रकार परिषदेतून शिवसेना नेते गायब का? सर्वच भाजप नेत्यांचा एकच सवाल!

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.