नारायण राणे विश्रांतीसाठी मुंबईला जाणार, गुरुवारपासून पुन्हा जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात – प्रवीण दरेकर

महाड न्याय दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यानंतर नारायण राणे आता मुंबईला जाणार आहे. तिथे 1 दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते गुरुवारपासून पुन्हा जनआशीर्वाद यात्रा सुरु करतील, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. मुंबई राणे यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाणार असल्याचंही दरेकर यांनी यावेळी सांगितलं.

नारायण राणे विश्रांतीसाठी मुंबईला जाणार, गुरुवारपासून पुन्हा जन-आशीर्वाद यात्रेला सुरुवात - प्रवीण दरेकर
प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते


रायगड : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी राणे यांना जामीन मंजूर केला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नारायण राणे यांना जामीन देण्यात आलाय. मात्र, 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे. त्यानंतर रात्री 12 च्या सुमारास राणे कोर्टाच्या बाहेर पडले. मात्र त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. तर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांनी माध्यमांशी संवाद साधत राणेंच्या पुढील कार्यक्रमाची आणि जनआशीर्वाद यात्रेबाबत माहिती दिली. (Praveen Darekar informed that Rane will start Jana Aashirwad Yatra from Thursday)

महाड न्याय दंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केल्यानंतर नारायण राणे आता मुंबईला जाणार आहे. तिथे 1 दिवस विश्रांती घेतल्यानंतर ते गुरुवारपासून पुन्हा जनआशीर्वाद यात्रा सुरु करतील, अशी माहिती प्रवीण दरेकर यांनी दिली आहे. मुंबई राणे यांच्या प्रकृतीची तपासणी केली जाणार असल्याचंही दरेकर यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे राणे यांची यांची जन-आशीर्वाद यात्रा उद्या होणार नाही अशीच शक्यता सध्या तरी वर्तवण्यात येत आहे. मात्र, उर्वरित यात्रा ते पूर्ण करणार असल्याचं दरेकर यांनी स्पष्ट केलंय.

कोर्टाकडून राणेंना अटीशर्तीसह जामीन

जामीन मंजूर करताना महाड कोर्टानं काही अटी घातल्या आहेत. राणे यांना 15 हजार रुपयाच्या जातमुचकल्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. तसंच त्यांना भविष्यात असं वक्तव्य करता येणार नाही. ऑडिओ चेक करण्यासाठी राणे यांना एकदा पोलीस ठाण्यात यावं लागणार आहे. त्यासाठी राणे यांना 7 दिवस आधी नोटीस दिली जाईल. त्याचबरोबर 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे.

परब, गोऱ्हे, कायंदे, भास्कर जाधवांवर चंद्रकांत पाटील बरसले

राणे साहेबांना जामीन मिळाला नसता तर राज्यभर आम्हाला प्रखर निषेध व्यक्त करावा लागला असता. तुमचा कोकणातला बेस संपला. लोकांना तुमचा चेहरा कळला, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेवर निशाणा साधलाय. अनिल परब हे काय गृहमंत्री किंवा न्यायाधीश आहेत काय? ते पोलीस अधीक्षकांना राणेंना बळाचा वापर करा म्हणून आदेश कसा काय देऊ शकतात? शपथ घेताना तुम्ही गोपनियतेची आणि राज्याची शपथ घेता, हे राज्याचं हित आहे काय? अशी प्रश्नांची सरबत्तीच पाटील यांनी केली आहे. आम्ही नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातही कोर्टात जाणार आहोत. उपसभापती कुठल्याही पक्षाचे नसतात. पण गेल्या महिनाभरापासून त्या शिवसेनेच्या प्रवक्त्याप्रमाणे भूमिका मांडत आहेत. एवढीच हौस आहे तर उपसभापतीपदाचा राजीनामा द्या, असा टोलाही पाटील यांनी लगावला आहे. आमच्या भाजपमधून गेलेल्या मनिषा कायंदे यांचंही काहीतरी चालू होतं. सध्या भास्करराव जाधव यांच्यातर अंगात आलं आहे. सगळ्यांना उद्धव ठाकरे यांच्या गूडबुक्समध्ये राहायचं आहे. पण यांचं काय चालू आहे काही कळायला मार्ग नाही, अशी टीकाही पाटील यांनी गोऱ्हे, कायंदे आणि भास्कर जाधवांवर केलीय.

संबंधित बातम्या : 

Narayan Rane Arrest : नारायण राणे यांना मोठा दिलासा, महाड न्यायदंडाधिकाऱ्यांकडून 4 अटींसह जामीन मंजूर

Narayan Rane Bail : नारायण राणे यांना अखेर जामीन मंजूर, महाड कोर्टात नेमकं काय घडलं?

Praveen Darekar informed that Rane will start Jana Aashirwad Yatra from Thursday

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI