‘महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले लोक काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?’

महाराष्ट्रात सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत ते काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का? ते मराठा समाजाबद्दल ब्र सुध्दा काढत नाहीत, अशी खंतही नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केलीय.

'महाराष्ट्र सरकारमध्ये बसलेले लोक काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का?'
नरेंद्र पाटील
Follow us
| Updated on: Sep 02, 2021 | 4:53 PM

कराड : महाविकास आघाडी सरकारला मराठा समाजा बद्दल आस्था नाही, हे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 2021 – 2022 सालाकरिता फक्त साडे बारा कोटी रुपये तरतूद करुन दाखवुन दिलं आहे, असा आरोप माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी केलाय. आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडे साडे बारा कोटी रुपये एक सप्टेंबरला वर्ग करत असल्याचं एक परिपत्रक मला मिळालं आहे, अशी माहिती पाटील यांनी दिलीय. ते कराडमध्ये बोलत होते. (Narendra Patil criticizes Maha Vikas Aghadi government over funds)

राज्यातील 30 हजार युवा उद्योजकांना या योजनेतून 200 कोटी रुपयांचं कर्ज वाटत करण्यात आलेलं आहे. दर महिन्याला 8 कोटी, तर दरवर्षी 96 कोटी रुपये व्याज परतावा केला जातो. या योजनेसाठी राज्य शासनाकडून केवळ साडे बारा कोटींची तरतूद केल्याने उद्योजक अडचणीत येणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात सरकारमध्ये जे लोक बसलेले आहेत ते काय तोंडात पान-गुटखा खाऊन बसेल आहेत का? ते मराठा समाजाबद्दल ब्र सुध्दा काढत नाहीत, अशी खंतही नरेंद्र पाटील यांनी यावेळी व्यक्त केलीय.

नरेंद्रच्या हातावर ‘देवेंद्र’चा टॅटू

दरम्यान, नरेंद्र पाटील यांनी आपल्या हातावर ‘देवेन्द्र’ हे नाव कोरले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरुनच नरेंद्र पाटलांनी हा टॅटू बनवून घेतला आहे. देवेंद्र फडणवीस सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या. नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

काय म्हणाले नरेंद्र पाटील?

माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी स्वतःच्या डाव्या हाताच्या मनगटावर देवेन्द्र हे नाव कोरले आहे. विरोधीपक्ष नेते “देवेन्द्र फडणवीस” यांचंच हे नाव कोरलं आहे, असं नरेंद्र पाटलांनी स्पष्ट केलं. “त्याचं कारण म्हणजे एकदा देवेंद्र फडणवीस म्हणाले होते, की नरेंद्र पाटील हे आमच्या मनात आहेत आणि म्हणून देवेंद्रजी माझ्या मनात आहेत आणि फक्त मी त्यांचं नाव आता हातावर कोरलं आहे. आणि याचा मला आनंद आहे. मला खूप बरं वाटतंय कारण ते सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत” अशा भावना नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केल्या.

कोण आहेत नरेंद्र पाटील?

नरेंद्र पाटील हे माथाडी कामगारांचे नेते माथाडी कामगार संघटनेचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांचे सुपुत्र नरेंद्र पाटील विधिमंडळाचे माजी आमदार नरेंद्र पाटलांनी शिवसेनेकडून सातारा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती. सातारा मतदारसंघातून पराभवानंतर दीड वर्षांनी शिवसेनेला रामराम

इतर बातम्या : 

विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस, मेटेंचा गंभीर आरोप; मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी

देशमुख तुम्ही दरोडा घालायचा आणि पोलिसांनी तुमचा हार टाकून स्वागत करायचं का? : चंद्रकांत पाटील

Narendra Patil criticizes Maha Vikas Aghadi government over funds

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.