मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. मदत आणि पुनर्वसन मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावर मेटेंनी गंभीर आरोप केलाय. विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस आहे. त्यामुळे त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करायला हवी. पण मुख्यमंत्री फक्त बघत बसतात, असा घणाघात मेटे यांनी केलाय. मागासवर्गीय आयोग हा जातीयवादी आयोग आहे, त्यामुळे तो बंद करावा, अशी मागणीही मेटे यांनी यावेळी केलीय. (Vinayak Mete alleges that Minister Vijay Vadettiwar is a racist man)