शाखा ताबात घेण्यावरून वाद, शिंदेगटाचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा

| Updated on: Oct 27, 2022 | 5:11 PM

शिंदेगटाचे नेते नरेश म्हस्के यांनी विविध मुद्द्यांवर आपली मतं मांडली आहेत. वाचा...

शाखा ताबात घेण्यावरून वाद, शिंदेगटाचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी समर्थक आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेना पक्षात बरेच बदल झाले. शिवसेना पक्षाच्या जागोजागी असलेल्या कार्यालयांवर अधिका कुणाचा असाही प्रश्न उपस्थित झाला. मागच्या काही दिवसात शिवसेनेच्या शाखांवरल अधिकार कुणाचा, त्यावर ताबा कुणााच यावरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं. शिंदेगट जबरदस्तीने ठाकरेगटाच्या शाखांवर ताबा मिळवत असल्याचाही आरोप करण्यात आला. त्यावर आता शिंदेगटाच्या वतीने उत्तर देण्यात आलं आहे. शिंदेगटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी यावर बाजू मांडली आहे.

म्हस्के काय म्हणाले?

शिवसेनेच्या शाखा ताब्यात घेण्याचा विषयच येत नाही. आनंद दिघेंच्या निधनानंतर एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली ठाण्यात काम सुरू होतं. सर्व पदाधिकारी ते काम पाहत होते. ताब्यात घेण्याचा संबंध नाही. कारण जी गोष्ट आमचीच आहे ती ताब्यात घेण्याचा प्रश्नच नाही, असं नरेश म्हस्के म्हणालेत.

आमचे जिल्हाप्रमुख, शहर प्रमुख या शाखांमध्ये बसून काम करत होते. त्यामुळं ही शाखा ताब्यात घेण्याची गरजच नाही. सगळ्या गोष्टी रीतसर झालेल्या आहे, असंही म्हस्के म्हणालेत.

ठाकरेंवर निशाणा

जेव्हा तुमची सत्ता होती तेव्हा शेतकऱ्यांच्या मदत दिली नाही. तेव्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा का केला नाही?, असा सवाल म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे. शिवाय शिंदे फडणवीस सरकारने दुप्पट नुकसान भरपाई दिली असल्याचंही म्हस्के यांनी सांगितलं आहे.

नोटांवरील फोटोवरून सुरु असलेल्या वादावरही म्हस्केंनी भाष्य केलंय. नोटांवरच्या फोटोवरून देशात आणि राज्यात वाद घालणं योग्य नाही, असं म्हस्के म्हणालेत.