संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर संघर्ष उफाळला, ठाकरे-शिंदे गटाचे पदाधिकारी आमने-सामने!

खासदार हेमंत गोडसे यांनी 'संजय राऊत यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी' असे आव्हान दिले होते. आता या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते देखील आक्रमक झाले आहेत.

संजय राऊत यांच्या नाशिक दौऱ्यानंतर संघर्ष उफाळला, ठाकरे-शिंदे गटाचे पदाधिकारी आमने-सामने!
Follow us
| Updated on: Dec 05, 2022 | 11:22 AM

नाशिकः संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या नाशिक दौऱ्यानंतर शिवसेना ठाकरे (Thackeray) गट आणि शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष अधिकच उफाळून आला आहे. संजय राऊत यांनी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे (Hemant Godase) यांना ‘चेहरा’ नसल्याची टीका केली होती.

त्याला प्रत्युत्तर देताना खासदार हेमंत गोडसे यांनी ‘संजय राऊत यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी’ असे आव्हान दिले होते. आता या वक्तव्यानंतर ठाकरे गटाचे नेते देखील आक्रमक झाले आहेत.

शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी हेमंत गोडसे यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना आव्हान दिलंय. ‘खासदार हेमंत गोडसे यांनी संजय राऊत तर सोडाच पण माझ्यासमोर निवडून येऊन दाखवावे’ असे आव्हान त्यांनी खासदार गोडसे यांना दिले.

‘तुझ्या मुलाला निवडणुकीत कसे पाडले’ त्याच प्रकारे तुला देखील निवडणुकीत पाडेल’ असा घणाघात विजय करंजकर यांनी केला. तसेच खासदार झाल्यापासून हेमंत गोडसे यांनी विकासाचे एकही काम केले नसल्याचा दावा देखील त्यांनी केला.

‘यापुढे संजय राऊत तर सोडाच, एखाद्या शिवसैनिकावर जरी टीका केली, तर ते योग्य ठरणार नाही’, असा इशारा गोडसे यांना देण्यात आलाय. आता या प्रकरणी नाशिकमध्ये दोन्ही शिवसेनेच्या दोन्ही गटात संघर्ष तीव्र झाला असून, पुढे काय होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. दोन दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी नाशिकच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी बोलताना त्यांनी हेमंत गोडसेंवर निशाणा साधला होता. हेमंत गोडसे यांचं करिअर संपल्यात जमा आहे, असं वक्तव्य राऊत यांनी केलं होतं.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.