‘ते’ पुस्तक देवेंद्र फडणवीसांच्या बाजूचं, उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची शरद पवारांची भूमिका- नवाब मलिक

| Updated on: Nov 26, 2020 | 11:36 AM

नवाब मलिक यांनी 'ट्रेडिंग पॉवर' या पुस्तकावर जोरदार टीका केली आहे. हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूनं लिहिलं गेलं आहे. त्यांनी सांगितलं त्यानुसारच हे पुस्तक लिहीण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचीच शरद पवार यांची भूमिका होती, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

ते पुस्तक देवेंद्र फडणवीसांच्या बाजूचं, उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री करण्याची शरद पवारांची भूमिका- नवाब मलिक
Follow us on

मुंबई: प्रसिद्ध राजकीय लेखिका प्रियम गांधी यांचं ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावरुन आता राजकारण रंगण्यास सुरुवात झाली आहे. हे पुस्तक पूर्णपणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूचं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच मुख्यमंत्री करण्याची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका होती, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान (Nawab Malik allegations on Piyam Gandhis book)

नवाब मलिक यांनी ‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकावर जोरदार टीका केली आहे. हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूनं लिहिलं गेलं आहे. त्यांनी सांगितलं त्यानुसारच हे पुस्तक लिहीण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचीच शरद पवार यांची भूमिका होती, असं नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे. ज्यांनी बेईमानीनं सरकार बनवलं त्यांची बाजू यात मांडण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या कृत्यामुळे प्रतिमा मलिन झाली आहे. ती स्वच्छ करण्यासाठीच हे पुस्तक लिहिण्यात आल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपसोबत न जाण्याचाच निर्णय झाला होता. भाजप नेतेच राष्ट्रवादीला संपर्क करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत होते, असा दावाही नवाब मलिक यांनी केला आहे.

‘ट्रेडिंग पॉवर’ या पुस्तकात नेमकं काय म्हटलंय?

राष्ट्रवादीचा एक ज्येष्ठ नेता हा भाजप नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी शाह, शरद पवार, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अशी एक बैठक महिन्याच्या सुरुवातीला पार पडली होती. या बैठकीला राष्ट्रवादीचा एक बडा नेताही हजर होता.

या बैठकीनंतरची ही गोष्ट. राष्ट्रवादीचा बडा नेता फडणवीसांच्या कार्यालयात जातो आणि ‘पवारांनी आपली भूमिका बदलली असल्याचं’ सांगतो. ‘या टप्प्यावर पवारसाहेब भाजपला पाठिंबा देतील ही शक्यता फार धुसर आहे. पवारांना आपला वारसा जपायचा आहे. त्यांचं बरंच वय झालंय आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीचं हे अखेरचं पर्व आहे,’ असं हा बडा नेता फडणवीसांना सांगतो.

‘पवारांना आपली प्रतिष्ठा जपायची आहे. राष्ट्रवादीच्या निवडणूकपूर्व राजकीय मित्राला दिलेला शब्द पाळला तरच पवारसाहेबांची प्रतिष्ठा टिकू शकते. शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असेल तर अशा सरकारला पाठिंबा द्यायला काँग्रेल पक्ष उत्सुक आहे.’असं या पुस्तकात लिहिण्यात आलं आले.

संबंधित बातम्या:

पहाटेच्या शपथेची इनसाईड स्टोरी, फडणवीस म्हणाले, दादा जोखीम पत्करतोय, दादा म्हणाले माझ्यासोबत 28 आमदार

शिवसेनेच्या नेतृत्त्वातील युतीला अजित पवारांचा विरोध का?; ‘ट्रेडिंग पॉवर’मधील खळबळजनक दावे

Nawab Malik allegations on Piyam Gandhis book