शरद पवार-देवेंद्र फडणवीस भेटीवरून तर्कवितर्कांना उधाण; नवाब मलिक म्हणतात…

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यावरून तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. ही भेट राजकीय असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. (nawab malik reaction on devendra fadnavis-sharad pawar meeting)

शरद पवार-देवेंद्र फडणवीस भेटीवरून तर्कवितर्कांना उधाण; नवाब मलिक म्हणतात...
devendra fadnavis sharad pawar

मुंबई: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यावरून तर्कवितर्क वर्तवले जात आहेत. ही भेट राजकीय असल्याचीही जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, सत्ताधारी आणि विरोधक दुश्मनासारखे कधीच काम करत नाहीत. महाराष्ट्राची ती परंपरा नाही. अशा भेटी होत असतात. त्याचा चुकीचा अर्थ काढू नका, असं आवाहन करत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. (nawab malik reaction on devendra fadnavis-sharad pawar meeting)

नवाब मलिक यांनी मीडियाशी संवाद साधताना हे आवाहन केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची सोमवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी सदिच्छा भेट घेतली होती. शरद पवारांवर शस्त्रक्रिया झाल्यावर ते हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरी विश्रांती घेत होते. या कालावधीत अनेक लोकांनी तब्येतीची घरी येऊन विचारपूस केली होती. त्याच अनुषंगाने फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट घेतली दुसरं काही नाही, असं मलिक यांनी स्पष्ट केलं.

भेटींचा राजकीय अर्थ काढणं योग्य नाही

महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दुश्मनासारखे काम करत नाही ही महाराष्ट्राची परंपरा आहे. इथे व्यक्तीगत नाती टिकवली जातात शिवाय व्यक्तीगत गाठीभेटी या होत असतात. परंतु या भेटी राजकीय कारणासाठी होतात असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. विरोधी पक्षाचे काम विरोधी पक्ष करत असतो तर सत्ताधारी सत्ताधाऱ्यांचे काम करत असतात. महाविकास आघाडी पवारांनी बनवली आहे. त्यामुळे कुणीही या भेटीचा चुकीचा अर्थ लावून प्रचार करू नये. शिवाय फडणवीस यांनी ही सदिच्छा भेट होती असे जाहीर केले आहे, असेही ते म्हणाले.

त्यांना EWS मध्ये लाभ मिळणार

कुठल्याही वर्गात आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्या समाजाला EWS मध्ये लाभ मिळणार आहे. ज्यांचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे त्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. आजच्या घडीला मराठा समाजाला जे विशेष आरक्षण देण्यात आले होते ते न्यायालयाने रद्द केले आहे आणि आता ते प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे आता जो गरीब मराठा वर्ग आहे त्यांना राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी राज्यसरकारने हा आदेश निर्गमित केला आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला थोडाफार दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितलं.

म्हणून आदेश निर्गमित

संपूर्ण देशात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्केच आरक्षण देण्यात आलेले आहे. ज्या जातींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही त्यांना EWS चा लाभ घेता येईल. मराठा आरक्षणाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत जे गरीब मराठा लोक आहेत त्यांना याचा फायदा होईल म्हणून राज्यसरकारने आदेश निर्गमित केला असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. (nawab malik reaction on devendra fadnavis-sharad pawar meeting)

 

संबंधित बातम्या:

देवेंद्र फडणवीस काल शरद पवारांच्या निवासस्थानी, आज थेट एकनाथ खडसेंच्या घरी!

…तर भाजप पुढची 100 वर्षे सत्तेत येणार नाही; पवार-फडणवीस भेटीवर संजय राऊतांचं वक्तव्य

योगींचं टूलकिट, सपोर्ट करणाऱ्याला दोन रुपये, ऑडिओ व्हायरल झाल्याने खळबळ

(nawab malik reaction on devendra fadnavis-sharad pawar meeting)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI