कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही: नवाब मलिक

कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही, असा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही: नवाब मलिक

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणावरून भाजप नेत्यांनी सुरू केलेल्या आगपाखडीवर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. कुणीही कितीही टरटर केली तरी आकाश काही फाटणार नाही आणि पाऊस काही पडणार नाही, असा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे. (nawab malik slams bjp over cm uddhav thackerays dussehra rally speech)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यातून भाजपची चांगलीच पिसं काढली होती. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच भाजपवर जोरदार हल्ला केल्यानंतर घायाळ झालेल्या भाजप नेत्यांनी आज दिवसभरापासून शिवसेनेवर हल्ले चढवण्यास सुरुवात केली आहे. त्यात आता नवाब मलिक यांनी उडी घेऊन भाजप नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत. भाजपचे काही नेते मुख्यमंत्र्यांच्याबाबतीत अपशब्द वापरत आहेत. आणि एक मंत्री तुरुंगात जाणार असल्याचे भाकीत करत आहेत हे बोलणं योग्य नाही, असे नवाब मलिक म्हणाले. सभ्य समाजात आणि राजकारणात असंसदीय शब्दांचा प्रयोग होत असेल तर तो चुकीचा आहे. प्रत्येकाने मर्यादेत राहून भाषेचा प्रयोग केला पाहिजे, असा सल्लाही मलिक यांनी दिला.

कुणीही विचारधारा सोडली नाही

महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर चालते. कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना त्यांची विचारधारा सोडून सरकारमध्ये सामील झालेले नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. धर्माच्या आधारावर राजकारण करणे हा आमचा कार्यक्रम नाही. भाजप धर्माच्या आधारावर राजकारण करुन मतांचे राजकारण करते हे लोकांना माहित आहे, असा जोरदार टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

शिवसेना आणि भाजप या दोघांच्या वादात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्य परिस्थितीचा भाजपाला आरसा दाखवला आहे. वेगवेगळे भाष्य करुन भाजप जनतेची दिशाभूल करण्याचे काम कसे करतेय हे दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. शिवाय राज्यपाल व त्यांचे नेते लोकांची दिशाभूल कशी करत आहेत हे उघडपणे लोकांसमोर मांडले आहे, असंरही त्यांनी सांगितलं. (nawab malik slams bjp over cm uddhav thackerays dussehra rally speech)

संबंधित बातम्या:

नारायण राणे यांनी शिवसेनाप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांनी निष्ठेच्या गप्पा माराव्या? : अर्जुन खोतकर

उद्धव ठाकरेंनी बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं, नारायण राणेंचा घणाघात

संजय राऊत म्हणजे विदूषक, कोणत्या धुंदीत आहात?; नारायण राणेंची टीका

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI