दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येतात, याला घेरणं म्हणत नाही; नवाब मलिकांची टीका

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. (nawab malik slams pravin darekar over virar fire incident)

दरेकर जॅकेट घालून आरशात पाहून टीव्हीवर येतात, याला घेरणं म्हणत नाही; नवाब मलिकांची टीका
nawab malik
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 12:18 PM

मुंबई: विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सडकून टीका केली आहे. दरेकर जॅकेट घालून आरशासमोर पाहून टीव्हीसमोर येतात. मी कसा दिसतो असं कॅमेरामनला विचारतात. याला सरकारला घेरणं म्हणत नाहीत, अशी खोचक टीका नवाब मलिक यांनी केली आहे. (nawab malik slams pravin darekar over virar fire incident)

नवाब मलिक यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही टीका केली आहे. राज्यात फायर ऑडिट केल्याशिवाय कोणत्याही रुग्णालयाला परवानगी देण्यात येत नाही. खासगी रुग्णालयात कधी कधी एसीमध्ये शॉर्ट सर्किट होऊन आग लागते. अशावेळी सरकारला जबाबदार धरणं योग्य नाही, असं सांगतानाच सरकारला कोण घेरतंय हा प्रश्नच आहे. येड्यासारखे लोक बोलत आहेत. उठसूट जॅकेट घालून कॅमेऱ्यासमोर येत आहेत. प्रतिक्रिया देण्यापूर्वी मी कसा दिसतो असं कॅमेरामनला विचारतात. काही विरोधी पक्षनेते तर कार्यालयात बसून केवळ प्रतिक्रिया देण्याचं काम करत आहेत, असा टोला मलिक यांनी लगावला.

पब्लिसिटीसाठी धडपड

प्रवीण दरेकर आरसा पाहून जॅकेट घालून येतात. मी कसा दिसतो हे विचारतात. कॅमेरामनला म्हणतात फ्रेम दाखवा. मग मीडियासोमर येतात. याला घेरणं म्हणत नाहीत. ही खालच्या पातळीवर जाऊन पब्लिसिटीसाठी केलेली धडपड आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

अहंकार मोदींकडून शिकतोय

कुणाला किती अहंकार आहे हे लोक पाहत आहेत. भाजपचा अहंकार लोकांनी पाहिला आहे. आमचे लोक जमिनीवर आहेत. अहंकार कसा असावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शिकत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

चौकशीतून सत्यबाहेर येईल

वसईत 13 जणांनी प्राण गमावलेला आहे. हे खासगी रुग्णालय आहे. ते पालिकेचे किंवा शासनाचे रुग्णालय नाही. एखाद्या रुग्णालयाला परवानगी देण्यात येते तेव्हा त्याचे फायर ऑडिट झालेलं असतं. आता ही घटना घडली ती अत्यंत दुर्देवी आहे आणि तिच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. स्वत: नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे घटनास्थळी गेले आहेत. त्यांनी पीडित कुटुंबांना मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. पण ज्या पद्धतीने भाजपचे लोक उठसूट राजीनामा द्या, पायउतार व्हा अशी मागणी करत आहेत, ते योग्य नाही. काही लोक सकाळी सकाळीच जबाबदारी कुणाची असा जाब विचारत असतात. चौकशी अंती सत्य बाहेर येईल, खासगी रुग्णालयातच काही चूक असेल तर त्याबद्दल सरकारला दोष देणं योग्य नाही, असं ते म्हणाले. (nawab malik slams pravin darekar over virar fire incident)

संबंधित बातम्या:

आणखी किती बळी हवेत?, या मंत्र्यांना पायउतार करा; भाजपचा संताप

चंद्रकातदादा म्हणाले झोप कमी करा, अजित पवार म्हणतात, भाजपचे किती आमदार मला भेटतात हे तपासा

Nashik Oxygen Leak LIVE Updates: नाशिक दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होणार, राज्य सरकारकडून समितीची नेमणूक

(nawab malik slams pravin darekar over virar fire incident)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.