नवाब मलिकांकडून नितेश राणेंची खिल्ली, राणेंच्या ‘म्यॉव म्यॉव’ला फक्त एका फोटोने उत्तर

नवाब मलिकांकडून नितेश राणेंची खिल्ली, राणेंच्या 'म्यॉव म्यॉव'ला फक्त एका फोटोने उत्तर
नवाब मलिक, नितेश राणे

नितेश राणेंच्या या कृतीला आता महाविकास आघाडीकडून उत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्वीट केलाय. मलिक यांनी कोंबडीचा फोटो ट्वीट करत नितेश राणेंवर निशाणा साधलाय. या फोटोकडे निट पाहिलं तर शरीर कोंबडीचं आणि तोंड मांजरीचं असल्याचं पाहायला मिळत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Dec 24, 2021 | 4:35 PM

मुंबई : विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन (Winter Session) सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादाने चांगलच गाजत आहे. अधिवेशनाच्या पहिला दिवस भास्कर जाधवांनी पंतप्रधान मोदींची केलेली नक्कल आणि त्यानंतर मागावी लागलेली माफी यामुळे गाजला. तर दुसऱ्या दिवशी भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी विधानसभेच्या पायऱ्यांवर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना डिवचलं. म्यॉव म्यॉव असा आवाज काढत नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला. नितेश राणेंच्या या कृतीला आता अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एका फोटोद्वारे उत्तर दिलंय.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे सभागृहात जात होते. त्यावेळी विधानसभेच्या पायऱ्यांवर बसलेल्या भाजप आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात होती. त्याचवेळी नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढत आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे यांनी मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं आणि पुढे निघून गेले. नितेश राणेंचा हा आवाज टीव्ही चॅनेलच्या कॅमेरात कैद झाला. याबाबत नितेश राणेंना विचारलं असता बाळासाहेबांची शिवसेना आता राहिली नाही. शिवसेनेच्या वाघाची आता मांजर झालीय, अशी टीका त्यांनी केली होती.

पैहचान कौन? नवाब मलिकांकडून खास फोटो ट्वीट

नितेश राणेंच्या या कृतीला आता महाविकास आघाडीकडून उत्तर देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी एक फोटो ट्वीट केलाय. मलिक यांनी कोंबडीचा फोटो ट्वीट करत नितेश राणेंवर निशाणा साधलाय. या फोटोकडे निट पाहिलं तर शरीर कोंबडीचं आणि तोंड मांजरीचं असल्याचं पाहायला मिळत आहे. तसंच हा फोटो ट्वीट करताना मलिक यांनी पैहचान कौन? असा खोचक सवालही केलाय.

विधानभवनाच्या पायऱ्यांवर नेमकं काय घडलं?

भाजप आमदार नितेश राणेंसह भाजपचे इतर आमदार पायरीवर बसून विविध मुद्द्यांवरून सरकारविरोधात घोषणाबाजी करत होते. शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापले जात आहे. परीक्षा घोटाळा आदी मुद्द्यांवरून विरोधक विधानभवनाच्या पायरीवर घोषणा देत होते. काय म्हणाले दादा, ठाकरे सरकार शोधून आणा… अशा घोषणा विरोधक देत होते. त्याचवेळी आदित्य ठाकरे हे मंत्री सुनील केदार यांच्यासह विधानसभेत जायला निघाले. त्यावेळी नितेश राणे यांनी म्याऊ… म्याऊ… म्याऊ… म्याऊ… अशा जोरजोरात घोषणा द्यायला सुरुवात केली. नितेश राणे वारंवार या घोषणा देऊन स्वत:ही हसत होते. त्यांच्या घोषणांवर भाजपचे नेतेही हसत होते.

इतर बातम्या :

Video : विधानसभेत ‘झोपा काढता का रे?’ पाहा अजित पवारांची बेधडक स्टाईल…

थकबाकीदारांना माफी, नियमित व्याज अदा करणाऱ्या शेतकऱ्यांचे काय ? उपमुख्यमंत्र्यांनी सांगितली सरकारची रणनीती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें