भाजपची हुकूमशाही, ईडी दाखवली तर आता सीडीही निघणार, अमोल मिटकरींचा इशारा

भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेले नेते एकनाथ खडसे यांनी ईडीने नोटीस बजावली आहे (NCP Amol Mitkari slams BJP over ED probe of NCP leader Eknath Khadse).

भाजपची हुकूमशाही, ईडी दाखवली तर आता सीडीही निघणार, अमोल मिटकरींचा इशारा


मुंबई : भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झालेले नेते एकनाथ खडसे यांनी ईडीने नोटीस बजावली आहे. येत्या 30 डिसेंबरला ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, याच समन्सवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोत मिटकरी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. “भाजपची ही हुकूमशाही सुरु आहे. ईडीची नोटीस ही सूडबुद्धीने देण्यात आली आहे”, असा आरोप त्यांनी केला आहे (NCP Amol Mitkari slams BJP over ED probe of NCP leader Eknath Khadse).

“मागच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना ईडीने नोटीस पाठवली होती. आता खडसेंना पाठवली आहे. खडसेंमुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपचे बुरुज ढासळायला लागले आहेत. त्या धास्तीने केंद्र सरकारकडून हे दबावतंत्र वापरले गेले आहेत. ज्यादिवशी एकनाथ खडसे यांनी पक्षप्रवेश केला त्याचदिवशी त्यांनी हे ईडीची नोटीस देतील, असं सांगितलं होतं. पण ते ईडी देतील तर मी सीडी दाखवील, असं विधान त्यांनी केलं होतं. ईडी दाखवली तर सीडीही निघणार आहे. भाजपचं हे दबावतंत्राचं राजकारण आहे. भाजप हुकूमशाही गाजवत आहे. या कारवाईला काही अर्थ नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“खडसेंना ईडीचे समन्स हे होणारच होतं. महाराष्ट्रात ज्यांनी भाजप विरोधात मोहिम उघडली, त्यांच्याविरोधात केंद्र सरकारकडून दबावगट निर्माण करुन अशा पद्धतीच्या नोटीस दिल्या जाणार आहेत. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी पत्रकार अर्नव गोस्वामी आणि अभिनेत्री कंगना रनौतचा मुद्दा मांडला होता. प्रताप यांनी हक्कभंगाचा एल्गार पुकारला होता. त्यानंतर त्यांना ईडीने नोटीस पाठवली”, असा दावा त्यांनी केला.

“आता महाराष्ट्राच्या जनतेलादेखील माहिती पडलंय, कशाप्रकारे यंत्रणांचा चुकीचा फायदा घेऊन भाजपचे लोकं धिंगाणा घालत आहेत. लोकांना हे जवळपास लक्षात आलं आहे”, असं अमोल मिटकरी यांनी सांगितलं (NCP Amol Mitkari slams BJP over ED probe of NCP leader Eknath Khadse).

‘खडसे भक्कम, कारवाईतून काहीच निषपण्ण होणार नाही’

“ज्यादिवशी खडसेंनी राष्ट्रादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला त्याचदिवशी त्यांची ईडी किंवा इतर चौकशी होईल, हे गृहित होतं. कारण जे कुणी भाजपच्या विरोधात जातात त्यांना या न त्या प्रकारे कसा न त्रास दिला जातो, मग ते ईडी किंवा इतर माध्यम असेल, चौकशा सुरु केल्या जातात. याआधी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्यासोबत केलं. आता एकनाथ खडसे यांना नोटीस दिली. एकनाथ खडसे भक्कम आहेत. ते ईडीच्या चौकशीला सामोरे जातील, त्या चौकशीतून काहीच निषपण्ण होणार नाही. पण भाजपने हे गलिच्छ आणि सूडबुद्धिचं राजकारण सोडलं पाहिजे”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI