'या' उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी खुद्द शरद पवार उपस्थित राहणार

शरद पवार मंगळवारी भूम शहरात सकाळी 10 वाजता येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली. पाटील घराण्याने (MLA Rahul Mote) राष्ट्रवादी सोडल्यानंतर शरद पवारांनी उस्मानाबादवर स्वतः लक्ष दिलंय.

'या' उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी खुद्द शरद पवार उपस्थित राहणार

उस्मानाबाद : राष्ट्रवादीचे परंडा मतदारसंघाचे उमेदवार आमदार राहुल मोटे (MLA Rahul Mote) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार येणार असल्याची माहिती आहे. यानंतर शरद पवार यांची सभाही होणार असल्याचं सांगण्यात येतंय. शरद पवार मंगळवारी भूम शहरात सकाळी 10 वाजता येणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली. पाटील घराण्याने (MLA Rahul Mote) राष्ट्रवादी सोडल्यानंतर शरद पवारांनी उस्मानाबादवर स्वतः लक्ष दिलंय.

43 वर्षीय राहुल मोटे हे सलग तीन वेळा आमदार असून त्यांचे वडील दिवंगत नेते महारुद्र मोटे हे दोन वेळा आमदार होते. राहुल मोटे हे अजित पवार यांचे निकटवर्तीय नातलग असून मोटे डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग शिक्षित आहेत. राहुल मोटे हे 2004, 2009 आणि 2014 या तीन निवडणुकात विजयी झाले आहेत. मोटे परिवाराची या मतदारसंघात 25 वर्ष सत्ता आहे.

पद्मसिंह पाटील परिवाराने पवारांची साथ सोडत राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केला. यानंतर राष्ट्रवादीत निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पवारांनी उस्मानाबाद येथे कार्यकर्ता मेळावा घेतला होता. त्यानंतर आता पवार भूम येथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा अर्ज भरण्यासाठी येत आहेत. मोटे हे पद्मसिंह पाटील यांचे भाचे आहेत.

शिवसेनेचे नेते आणि जलसंधारण मंत्री तानाजी सावंत स्वतः परंडा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणार आहेत. यामुळे मोटे यांची दमछाक होऊ शकते. त्यामुळेही पवार येणार असल्याचं बोललं जात आहे.

परंडा मतदारसंघातील मागील पाच निवडणुकांचा निकाल

  • 2014 – राहुल मोटे, राष्ट्रवादी 12389 मतांनी विजयी
  • 2009 – राहुल मोटे, 6002 मतांनी राष्ट्रवादी विजयी
  • 2004 – राहुल मोटे , 11491 मतांनी राष्ट्रवादी विजयी
  • 1999 – ज्ञानेश्वर पाटील, 8185 मतांनी शिवसेना विजयी
  • 1995 – ज्ञानेश्वर पाटील, 5742 मतांनी शिवसेना विजयी
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *