Sunetra Pawar | उमेदवारी जाहीर झाल्यावर राष्ट्रवादीमधील नाराजीच्या मुद्यावर सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? VIDEO

Sunetra Pawar | सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून राज्य सभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. याआधी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. सुनेत्रा पवार आता राज्यसभेवर जाणार आहेत.

Sunetra Pawar | उमेदवारी जाहीर झाल्यावर राष्ट्रवादीमधील नाराजीच्या मुद्यावर सुनेत्रा पवार काय म्हणाल्या? VIDEO
Sunetra Pawar
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 3:23 PM

राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. तुमची निवड बिनविरोध आहे या पत्रकारांच्या प्रश्नावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ’18 तारीख शेवटची आहे, तो पर्यंत वाट बघावी लागेल’ “पक्षाने मला राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार तसेच पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते सगळ्याचेचं मी मनापासून आभार मानते. एक अधिकृत पक्षाचा आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून जो विश्वास माझ्यावर पक्षाने दाखवलाय. त्या संधीच सोन करण्याचा प्रयत्न करेन” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या.

तुम्हाला उमेदवारी मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत का? या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, “अशी नाराजी कुठे दिसली नाही, भुजबळ फॉर्म भरतातना उपस्थित होते. त्यांनी शुभेच्छा दिल्या. नक्कीच कोणती नाराजी नाही” सुरुवातीला अजित पवार तुम्हाला उमेदवारी द्यायला तयार नव्हते का? या प्रश्नावरही सुनेत्रा पवार यांनी उत्तर दिलं. “खरतर मला उमेदवारी द्यावी ही पक्षातून आणि जनतेतून मागणी होत होती. आग्रह धरु नये म्हणून मी कार्यकर्त्यांना विनंती केली. लोकसभेच्या उमेदवारीवेळी सुद्धा जनतेतून मागणी करण्यात आली होती”

पार्थ पवार नाराज का?

पार्थ पवार सुद्धा राज्यसभेसाठी इच्छुक होते, तुमच्या उमेदवारीमुळे ते नाराज आहेत का? या प्रश्नावर सुनेत्रा पवार म्हणाल्या की, “त्याने स्वत:च सांगितलं की, सगळ्या कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार मी राज्यसभेच अधिकृत उमेदवार असलं पाहिजे. त्याचा सुद्धा आग्रह होता. सगळ्या पक्षाच्या सहमतीने उमेदवारी जाहीर झालीय” असं सुनेत्रा पवार म्हणाल्या. भुजबळांनी नाराजी व्यक्त केली

दरम्यान आज सकाळी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची बातमी आली. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राज्यसभा उमेदवारीबाबत बैठक झाली. या बैठकीत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.