AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव शिवसेनेत घरवापसी करणार?

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव शिवसेनेत पुनर्प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. जाधव यांनी मात्र त्या केवळ अफवा असल्याचा दावा केला आहे.

राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव शिवसेनेत घरवापसी करणार?
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Aug 26, 2019 | 10:29 AM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) आणखी एका दिग्गज नेता रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे. राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) शिवसेनेत (Shivsena) घरवापसी करणार असल्याची चर्चा आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत भास्कर जाधव यांनी कालच तासभर चर्चा केली होती.

गेल्या काही दिवसांमध्ये उद्धव ठाकरेंसोबत भास्कर जाधव यांची झालेली ही दुसरी बैठक होती. भास्कर जाधव हे कोकणातील गुहागर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात नगरविकास, क्रीडा, वन अशी विविध मंत्रालयं सांभाळली आहेत. रत्नागिरीच्या पालकमंत्रिपदाची धुराही त्यांच्या खांद्यावर होती.

दरम्यान, आपण कोणाचीही भेट घेतलेली नाही, शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा निव्वळ अफवा आहेत, असा दावा भास्कर जाधव यांनी ‘सकाळ’शी बोलताना केला आहे.

शिवसेनेतून सुरुवात

1982 मध्ये भास्कर जाधव शिवसैनिक म्हणून पक्षात आले. 1995 ते 2004 या काळात ते चिपळूणमधून दोन वेळा आमदारपदी निवडून आले. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेक लहान-मोठी पदंही भूषवली. 2004 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेला रामराम ठोकला होता.

2004 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात ते अपक्ष उमेदवार म्हणून उतरले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर जाधवांनी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला. 2009 मध्ये भास्कर जाधव यांनी शिवसेनेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम यांचा पराभव केला.

आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे नऊ खाती सोपवण्यात आली होती. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचं प्रदेशाध्यक्षपदही त्यांना सोपवण्यात आलं. भास्कर जाधव यांनी शिवसेनेची वाट धरल्यास राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जाईल.

बहुजन विकास आघाडीचे आमदार विलास तरे कालच पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत परतले. त्यावेळी ‘अजून कोण कोण येणार हे लवकरच कळेल’ अशी सूचक प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली होती. त्यामुळे हे नेते कोण आहेत, याची उत्सुकता व्यक्त केली जात आहे.

या दिग्गज नेत्यांची नावही चर्चेत

एकीकडे, राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ शिवसेनेत घरवापसी करणार असल्याच्या चर्चा आहेत. खासदार सुनील तटकरेही शिवबंधन हाती बांधणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र या तिन्ही नेत्यांनी पक्षांतराच्या चर्चा धुडकावल्या होत्या. आता भास्कर जाधव यांच्या नावाची त्यात भर पडली आहे.

युतीमध्ये इनकमिंग

राष्ट्रवादी ते भाजप : शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि राष्ट्रवादीचे संस्थापक सदस्य मधुकर पिचड, त्यांचे सुपुत्र वैभव पिचड (Vaibhav Pichad), साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendra Raje Bhonsle), नवी मुंबईचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक (Sandeep Naik),  राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh), राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर (Sachin Ahir) यांनी आतापर्यंत भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या वेळी रणजितसिंह मोहिते पाटील (Ranjitsinh Mohite Patil) आणि विजयसिंह मोहिते पाटील (Vijaysinh Mohite Patil) यांनी भाजपच्या तंबूत प्रवेश केला आहे.

राष्ट्रवादीला रामराम : रामराजे निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar), दिलीप सोपल (Dilip Sopal) यासारखे राष्ट्रवादीचे दिग्गज नेतेही पक्ष सोडण्याच्या मार्गावर आहेत.

शिवसेनेत घरवापसी : लोकसभा निवडणुकांच्या वेळी राष्ट्रवादीच्या गोटात गेलेले धनराज महाले (Dhanraj Mahale) शिवसेनेत परतले. तर बहुजन विकास आघाडीचे बोईसरमधील आमदार विलास तरे (Vilas Tare) यांनीही पुन्हा शिवबंधन बांधलं.

काँग्रेस ते युती : काँग्रेसमध्ये असलेले सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) आणि त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील, मुंबईच्या वडाळा येथील काँग्रेस आमदार कालिदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) यांनी भाजपची वाट धरली. काँग्रेसकडून नऊ वेळा खासदार राहिलेल्या माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी भाजप, तर कन्या आणि काँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

Follow Us
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं