राष्ट्रवादीची पहिली संभाव्य यादी 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती

मुंबई : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्ष उमेदवाराचं नाव निश्चित करण्यासाठी धावाधाव करत आहेत. त्यातच काँग्रेसची संभाव्य 12 उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती आल्यानंतर, आता राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीतील संभाव्य नावांची यादीही ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आजच जाहीर होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीची पहिली …

राष्ट्रवादीची पहिली संभाव्य यादी 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती

मुंबई : लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्ष उमेदवाराचं नाव निश्चित करण्यासाठी धावाधाव करत आहेत. त्यातच काँग्रेसची संभाव्य 12 उमेदवारांची यादी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती आल्यानंतर, आता राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीतील संभाव्य नावांची यादीही ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली यादी आजच जाहीर होण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीची पहिली संभाव्य यादी :

  1. ईशान्य मुंबई – संजय दीना पाटील
  2. बारामती – सुप्रिया सुळे
  3. नाशिक – समीर भुजबळ
  4. बुलडाणा – राजेंद्र शिंगणे
  5. सातारा – छत्रपती उदयनराजे भोसले
  6. मावळ – पार्थ पवार
  7. कोल्हापूर – धनंजय महाडिक
  8. भंडारा – गोंदिया – वर्षा पटेल
  9. जळगाव – गुलाबराव देवकर

‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागलेल्या यादीनुसार, पहिल्या यादीतच अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचे नाव असून, बारामतीतून सुप्रिया सुळे, कोल्हापुरातून धनंजय महाडिक, साताऱ्यातून उदयनराजे भोसले ही अपेक्षित नावंही पहिल्या यादीत आहेत.

भंडारा-गोंदियातून वर्षा पटेल, जळगावातून गुलाबराव देवकर, तर बुलडाण्यातून राजेंद्र शिंगणे यांना उमेदवारी मिळणार आहे, असे संभाव्य यादीवरुन दिसून येते.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *