महाराष्ट्रात राजकीय भूकंप, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री

राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्रातील सत्तास्थापनेत मोठा धक्का (NCP leader Ajit Pawar support BJP) देत भाजपसोबत सत्तास्थापना केली आहे.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, अजित पवार उपमुख्यमंत्री


मुंबई: महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे  (NCP leader Ajit Pawar support BJP) विधीमंडळ नेते अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तास्थापना केली आहे. आज (23 नोव्हेंबर) सकाळी अचानकपणे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदी आणि अजित पवार यांनी (NCP leader Ajit Pawar support BJP) उपमुख्यमंत्रिपदी शपथ घेतली. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून सुरु असलेला सत्तास्थापनेचा पेच सुटला आहे.

सत्तास्थापनेनंतर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी सर्वात प्रथम आमचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष अमित शाह यांचे आभार मानतो. महाराष्ट्राच्या जनतेने स्पष्ट जनादेश दिला होता, तरीही आमचा मित्रपक्ष शिवसेनेने युती तोडली. त्यामुळे अखेर आम्ही महाराष्ट्राला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ नेत्यांनी आम्हाला पाठिंबा दिला. त्यानंतर आम्ही राज्यपालांकडे दावा केला. राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे याबाबत माहिती देऊन आज आम्हाला शपथविधीसाठी बोलावलं. आम्ही स्थिर सरकार देऊ. शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहू.”


अजित पवार म्हणाले, “मागील अनेक दिवसांपासून सरकार स्थापन होत नव्हते. तसेच अनेक मागण्याही वाढत होत्या. त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला. शरद पवारांना याविषयी आधी माहिती दिली होती, पण नंतर मी त्यांना सांगत होतो की कोणी तरी दोघांनी किंवा तिघांनी एकत्र येऊन आल्याशिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळेच हा निर्णय घेतला.”

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या देशभरातील नेत्यांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र  मोदी यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे आणि अजित पवार यांचे अभिनंदन केलं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा शपथविधी

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI