AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपची कबर खोदायला सुरुवात, भाजपचेच अहंकारी नेते पक्षाला बुडवणार, अमोल मिटकरींचा टोला

भाजपचेच अहंकारी नेते कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल," अशी खोचक टीकाही मिटकरींनी केली. (NCP Amol Mitkari Criticism BJP on MLC election)

भाजपची कबर खोदायला सुरुवात, भाजपचेच अहंकारी नेते पक्षाला बुडवणार, अमोल मिटकरींचा टोला
| Updated on: Dec 05, 2020 | 10:39 AM
Share

अकोला : “अन होनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगाह जब जमा हो तिनो, अमर अकबर अँथनी,” अशी काव्यात्मक प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी दिली. “भाजपला भाजपचेच अहंकारी नेते कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल,” अशी खोचक टीकाही मिटकरींनी केली. (NCP Amol Mitkari Criticism BJP on MLC election)

राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपला धूळ चारली. या पार्श्वभूमीवर अमोल मिटकरींनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्यांनी महाविकासआघाडीला मतदान करणाऱ्यांचे आभार मानत भाजपवर हल्लाबोल चढवला. “अन होनी को होनी कर दे, होनी को अनहोनी, एक जगाह जब जमा हो तिनो, अमर अकबर अँथनी, म्हणून या महाविकास आघाडीने भाजपची कबर खोदायला सुरुवात केली आहे,” अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली.

“महाविकासआघाडीच्या सरकारने कालच एक वर्ष पूर्ण केलं आहे. यावेळी एका पुस्तक प्रकाशनाचा सोहळा पार पडला. त्यात अजित पवारांनी पाचही जागा आम्ही स्वाभिमानाने जिंकू असे सांगितले होते. महाराष्ट्रातील वातावरण आता बदललं आहे. भाजपच्या पतनाला आजपासून सुरुवात झाली आहे,” असे अमोल मिटकरी म्हणाले.

“येत्या निवडणुका महाविकासआघाडी एकत्र येऊन लढणार आहे. त्यामुळे भाजपला भाजपचेच अहंकारी नेते कसे बुडवतात, हे येत्या काळात महाराष्ट्राला दिसेल,” असे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले.

“मी निवडून आलेल्या पदवीधर आणि शिक्षक महाविकासआघाडीतून सर्व उमेदवारांचे अभिनंदन. तसेच मी मतदारांचेही आभार व्यक्त करतो. मतदारांनी अहंकाराला मूठमाती देऊन महाराष्ट्राच्या मातीने महाविकासाघाडीचा विचार स्वीकारला,” असेही अमोल मिटकरींनी सांगितले.

पदवीधर-शिक्षक निवडणुकीत महाविकासआघाडीची सरशी

महाविकासआघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी यंदा प्रथमच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची निवडणूक एकत्रपणे लढवली होती. मात्र, पदवीधर निवडणुकीतील भाजपची आजपर्यंतची कामगिरी पाहता महाविकासआघाडीचे कॉम्बिनेशन कितपत यशस्वी ठरणार, याबद्दल अनेकांना साशंकता होती. परंतु, धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची पोटनिवडणूक वगळता इतर सर्व ठिकाणी महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाले.

अगदी पुणे आणि नागपूर पदवीधर मतदारसंघ या भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्यामध्येही महाविकासआघाडीच्या उमेदवारांनी मुसंडी मारत विजय खेचून आणला. केवळ अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या जागेवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला.  (NCP Amol Mitkari Criticism BJP on MLC election)

संबंधित बातम्या : 

भाजपची उलटी गिनती सुरू, ही तर ट्रायल मॅच; शिंदे-गुलाबरावांची टोलेबाजी

फाजील नेतृत्वामुळे भाजपचा पराभव, मी पुन्हा येईन ही भावना अजून गेली नाही, खडसेंचा हल्लाबोल

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.