बुलेट ट्रेनचा प्रकल्प करण्याऐवजी त्याचा पैसा…; रोहित पवारांचं मोठं विधान

2016 साली ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काही लोक नागपूर खंडपीठात गेले होते. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं. महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरोधात आला.

बुलेट ट्रेनचा प्रकल्प करण्याऐवजी त्याचा पैसा...; रोहित पवारांचं मोठं विधान
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 8:10 PM

रवी खरात, नवी मुंबई: बुलेट ट्रेनच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (rohit pawar) यांनी भाजपवर (bjp) जोरदार टीका केली आहे. बुलेट ट्रेनमधून महाराष्ट्रातील लोकं गुजरातला जाणार नाहीत. या प्रकल्पामुळे छोटे-मोठे व्यवसाय जे मुंबईत होणार होते ते आता होणार नाहीत. बुलेट ट्रेनच्या (bullet train) 12 स्टेशनपैकी आठ स्थानके गुजरातमध्ये आहेत. तर महाराष्ट्रात फक्त चार स्टेशन आहेत. 508 किलोमीटर पैकी 155 किलोमीटर फक्त महाराष्ट्रात आहे. बाकी गुजरातला आहे. त्यामुळे बुलेट ट्रेनचा प्रकल्प करण्याऐवजी तो पैसा वेगळ्या गोष्टींसाठी वापरला तर या महाराष्ट्राची जास्त प्रगती होईल, असा टोला रोहित पवार यांनी लगावला आहे.

रोहित पवार हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी वेदांता प्रकल्पावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या काळात सर्व गोष्टी फायनल झाल्या होत्या. टॅक्स बेनिफिट, जागेची किंमत आदी सर्व गोष्टी फायनल झाल्या होत्या. पंतप्रधानांसोबतच्या बैठकीनंतर सर्व सूत्रं बदलली आणि वेदांता प्रकल्प गुजरातला गेला. पण फॉक्सकॉन डील अजून फायनल झाली नसेल तर गुजरातला जाणारा हा प्रकल्प महाराष्ट्रात कसा आणता येईल याचा प्रयत्न करावा, असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.

गेल्या दहा वर्षात महाराष्ट्राचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न झाला आहे. तशी आकडेवारीच सांगते. ही गोष्ट केंद्रातील मोठ्या नेत्यांना बोलू शकत नसाल आणि त्यामुळे महाराष्ट्राचे महत्त्व कमी होत असेल तर काळजी घेण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.

हे सुद्धा वाचा

यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केलं. 2016 साली ओबीसी आरक्षणाच्या विरोधात काही लोक नागपूर खंडपीठात गेले होते. त्यावेळी सत्तेत असणाऱ्या लोकांनी याकडे दुर्लक्ष केलं होतं. महाविकास आघाडीचे सरकार आले आणि सुप्रीम कोर्टाचा निर्णय विरोधात आला. महाविकास आघाडीचं सरकार 99 टक्के कामी आलं. आताच्या सरकारने केवळ एक टक्का प्रिंटिंगचं काम गेलं. तरीही हे लोक आरक्षणाचं श्रेय घेत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.