AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकीकडे मोदींकडून महाराष्ट्राचं कौतुक, दुसरीकडे प्रविण दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलं : रुपाली चाकणकर

प्रविण दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलं आहे, असा घणाघात रुपाली चाकणकर यांनी केला (Rupali Chakankar slams Pravin Darekar).

एकीकडे मोदींकडून महाराष्ट्राचं कौतुक, दुसरीकडे प्रविण दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलं : रुपाली चाकणकर
रुपाली चाकणकर यांचा प्रविण दरेकरांवर निशाणा
| Updated on: May 10, 2021 | 4:31 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा (Corona Vaccine) तुटवडा जाणवत आहे. राज्य सरकार या मुद्द्यावरुन केंद्र सरकारकडे बोट दाखवत आहे. तर भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी हा तुटवडा राज्य सरकारकडून जाणुनबुजून तयार केला जातोय, असा आरोप केला आहे. केद्र सरकारने लसींचा मुबलक साठा पाठवला असून ठाकरे सरकार जाणुनबुजून तुटवजा निर्माण करतंय, असा गंभीर आरोप त्यांनी केला. त्यांच्या या आरोपांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर उत्तर दिलं आहे. तसेच दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने पछाडलं असल्याचा घणाघात त्यांनी केलाय(Rupali Chakankar slams Pravin Darekar).

रुपाली चाकणकर नेमकं काय म्हणाल्या?

“एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी महाराष्ट्राचं कौतुक करत आहेत. आज नीती आयोगाच्या अध्यक्षांनी देशभरात यशस्वी ठरत असलेल्या मुंबई मॉडेलचं कौतुक केलं आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविणजी दरेकर यांना महाराष्ट्र द्वेषाने एवढं पछाडलं आहे की, त्यांना काय आरोप करावे याचं सुद्धा भान राहिलेलं नाहीये. अशीवक्तव्य करून तुम्ही सन्माननीय पंतप्रधान मोदीजींचा अपमान करताय”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या (Rupali Chakankar slams Pravin Darekar).

“केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कालच्या एका भाषणात अशा प्रकारचं गलिच्छ राजकारण करणाऱ्या भाजप नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. ते भाषण अजून तुमच्यापर्यंत आलेले दिसत नाही. वाटल्यास त्याची लिंक आम्ही तुम्हाला देऊ शकतो”, असा टोला त्यांनी लगावला.

प्रविण दरेकर नेमकं काय म्हणाले होते?

प्रविण दरेकर यांनी केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला लसींचा अपेक्षित पुरवठा होत नसल्याचे सर्व आरोप फेटाळून लावले. एकीकडे राज्य सरकार महाराष्ट्राने सर्वाधिक लसीकरण केल्याचा दावा करते. 30 लाख नागरिकांना लसीचे दोन्ही डोस मिळाल्याचे सांगते. मग या लसी केंद्र सरकारने दिल्याशिवाय मिळाल्या का? असा सवाल प्रविण दरेकर यांनी विचारला. तसेच ‘दूध का दूध, पानी का पानी’ करण्यासाठी राज्य सरकारने आजपर्यंत केंद्राकडून आलेली मदत आणि त्यांनी नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सुविधा या दोन गोष्टींची श्वेतपत्रिका काढावी, असे आव्हान प्रविण दरेकर यांनी दिले.

राज्यात कोरोना लसींचा मुबलक साठा आहे. मात्र, नागरिकांमध्ये केंद्र सरकारविरोधात रोष उत्पन्न करण्यासाठी ठाकरे सरकार जाणुनबुजून सामान्य नागरिकांना लस उपलब्ध करुन देत नसल्याचा गंभीर आरोप दरेकर यांनी केला. लसीकरणाच्या मुद्द्यावरुन राजकारण होता कामा नये. मात्र, ठाकरे सरकार केंद्र सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक कट आखून काम करत असल्याची टीका प्रवीण दरेकर यांनी केली.

हेही वाचा : केंद्राने मुबलक साठा पाठवलाय, ठाकरे सरकार लसींचा जाणुनबुजून तुटवडा निर्माण करतंय, दरेकरांचा गंभीर आरोप

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.