चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील या शिवसेना नेत्यांच्या वादात राष्ट्रवादी नेत्याची उडी, पालकमंत्री का हतबल सांगितलं कारण

आमदार चिमणराव पाटील हेच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वर दबाव आणतात, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व माजी जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी दिली.

चिमणराव पाटील आणि गुलाबराव पाटील या शिवसेना नेत्यांच्या वादात राष्ट्रवादी नेत्याची उडी, पालकमंत्री का हतबल सांगितलं कारण
गुलाबराव पाटील, चिमनराव पाटील, सतीश पाटील
Follow us
| Updated on: Jul 04, 2021 | 5:33 PM

जळगाव: राज्यात महाविकास आघाडी असल्याने शासकीय समित्या नियुक्तीत तिन्ही पक्षांना स्थान द्यावे असे आदेश आहेत. परंतु, आमदार चिमणराव पाटील एरंडोल, पारोळा मतदार संघात हा नियम पाळत नाहीत. त्यांच्यामुळेच आपण काम करण्यास हतबल झालोय, अशी व्यथा पालकमंत्री व शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्याकडे व्यक्त केली होती. आमदार चिमणराव पाटील हेच मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वर दबाव आणतात, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार व माजी जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी दिली. (NCP leader Satish Patil gave statement over Shivsena leader Gulabrao Patil and Chimanrao Patil issue)

शिवसेना नेत्यांच्या वादात राष्ट्रवादीची उडी

एरंडोल पारोळा मतदार संघाचे माजी आमदार व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.सतीश पाटील यांनी उडी घेतली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील आघाडी धर्म पाळतात मात्र चिमणराव पाटील पाळत नाहीत,असा आरोप सतीश पाटील यांनी केला. डॉ. सतीश पाटील म्हणाले,की शासकीय समित्यांच्या सदस्य नियुक्तीत 60:20:20 असा फॉर्म्युला तिन्ही पक्षांचा ठरला होता.ज्या तालुक्यात ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाच्या सदस्यांना 60 टक्के तर उर्वरित दोन पक्षांच्या 20-20 टक्के प्रतिनिधीत्व द्यावे असे ठरले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या तसेच इतर सर्व आमदारांच्या मतदार संघात हा फॉर्म्युला वापरला गेला मात्र आमदार चिमणराव पाटील यांनी मात्र एरंडोल पारोळा मतदार संघात हा फॉर्म्युला वापरला नाही, असा आरोप सतीश पाटील यांनी केला.

चिमणराव पाटलांकडून पालकमंत्र्यांना विरोध?

चिमणराव पाटील यांनी आपल्याच पक्षाच्या पालकमंत्र्यांना विरोध करीत एरंडोल पारोळा येथे एक सदस्य काँग्रेस व राष्ट्रवादी चा नियुक्त केला नाही. याबाबत आपण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना विचारणा केली असता,ते म्हणाले आमच्याच पक्षाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या मुळे मी काम करण्यास हतबल झालो आहे, असं डॉ. सतीश पाटील यांनी सांगितलं. शिवसेनेच्या पालकमंत्र्यावर दबाव आणून आमदार चिमणराव पाटील काम करून घेत असल्याचे दिसत आहे. तेच आपल्याला शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील त्रास देत असल्याचा आरोप करतात, त्यामुळे त्यांचे वक्तव्य बालिशपणाचं असल्याचे दिसत आहे, असा आरोप माजी आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केला.

चिमणराव पाटील काय म्हणाले होते?

चिमणराव पाटील यांनी शुक्रवारी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधत आपल्या मनातील व्यथा बोलून दाखविली. गुलाबराव पाटील यांना माझं या भागातील वर्चस्व सहन होत नाही. त्यामुळे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव घडवण्यात आला. त्यानंतर अजूनही मला अनेकदा डावलण्याचा प्रयत्न होतो. मी शिवसेनेत राहू नये, असे अनेकांना वाटत असल्याचेही चिमणराव पाटील यांनी म्हटले. त्यामुळे आता गुलाबराव पाटील यावर काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

संबंधित बातम्या:

मी शिवसेनेत राहू नये, असं अनेकांना वाटतंय, शिवसेनेच्या आमदाराचा मंत्र्यावर गंभीर आरोप

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा, 21 लाखांचा निधी मिळवा, आ. लंकेंच्या पावलावर या आमदाराचं पाऊल!

(NCP leader Satish Patil gave statement over Shivsena leader Gulabrao Patil and Chimanrao Patil issue)

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.