Monsoon Session : हात उगारण काय योग्य नाही; विचारांची लढाई विचारांनीच लढवी; अधिवेशनातील राड्यावर खडसेंची प्रतिक्रिया

पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरू आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. पाचवा दिवस चांगलाच वादळी ठरलाय

Monsoon Session : हात उगारण काय योग्य नाही; विचारांची लढाई विचारांनीच लढवी; अधिवेशनातील राड्यावर खडसेंची प्रतिक्रिया
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 24, 2022 | 2:15 PM

मुंबई :  पावसाळी अधिवेशन (Monsoon session) सुरू आहे. आज पावसाळी अधिवेशनाचा पाचवा दिवस आहे. चार दिवस वादळी ठरले. पाचवा दिवस वादळी ठरणार अशी अपेक्षा होती. आज सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याने जोरदार राडा झाल्याचे पहायला मिळाले. सुरुवातीला विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामध्ये पन्नास खोके एकदम ओक्के अशा घोषणा विरोधकांकडून देण्यात आल्या. विरोधकांच्या घोषणाबाजीमुळे सत्ताधारी देखील आक्रमक झाले. सत्ताधारी आमदारांकडून लवासातील खोके सिल्वह ओक ओक्के, वाझेचे खोक्के मातोश्री ओक्के अशा घोषणा देण्यात आल्या. या सर्व राड्यामध्ये आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्यामध्ये चांगलीच  जुंपली नंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं देखील पहायला मिळालं. यावर राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.  विचारांची लढाई विचारांनीच झाली पाहिजे. एकोंमेकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे हे काय योग्य नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले खडसे?

आज अधिवेशनादरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राडा पहायला मिळाला. धक्काबुक्कीचा प्रकार देखील घडला. या सर्व राड्यामध्ये आमदार महेश शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये चांगलीच  जुंपली या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विचारांची लढाई विचारांनीच लढली गेली पाहिजे. अधिवेशन काळात विधानभवनाच्या सर्व कोड ऑफ कंडक्टचे पालन झाले पाहिजे. तत्वाची लढाई तत्वाने लढावी. असं एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही. निषेध किंवा आंदोलन हे शांततेच्या मार्गाने व्हाव, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

हे सुद्धा वाचा

सत्ताधाऱ्यांकडून घोषणाबाजी

गेले चार दिवस विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी सुरू होती. मात्र आज अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी सत्ताधारी देखील तयारीत होते. विरोधकांनी घोषणाबाजी सुरू करताच भाजप आणि शिंदे गटाच्या आमदारांकडून देखील घोषणाबाजी सुरू करण्यात आली. ज्यामध्ये वाझेचे खोके मातोश्री ओके, लवासाचे खोके सिलव्ह ओक ओक्के अशी घोषणाबाजी सत्ताधाऱ्यांकडून सुरू करण्यात आली. सत्ताधाऱ्यांकडून देखील घोषणाबाजी सुरू झाल्याने वातावरण चांगलेच तापले.

Non Stop LIVE Update
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.