अजित पवार यांनी पुतण्याला निवडणुकीत पाडण्यासाठी खरंच फोन केला? रोहित पवार म्हणतात…

शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केलेल्या आरोपांवर आता रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्या आरोपांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर आता रोहित पवारांची प्रतिक्रिया समोर आलीय.

अजित पवार यांनी पुतण्याला निवडणुकीत पाडण्यासाठी खरंच फोन केला? रोहित पवार म्हणतात...
Follow us
| Updated on: Mar 31, 2023 | 8:07 PM

मुंबई : ठाणे महापालिकेचे माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल एक मोठा दावा करुन खळबळ उडवून दिलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत पाडण्यासाठी अजित पवारांनी प्रयत्न केल्याचा मोठा आणि खळबळजनक दावा नरेश म्हस्के यांनी केला. त्यांचा हा दावा अजित पवारांनी खोडून काढलाय. त्यानंतर म्हस्के यांच्या या आरोपांवर आता रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. रोहित पवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिलीय. यावेळी त्यांनी नरेश म्हस्के यांच्या आरोपांवर भूमिका मांडली.

“आपण माहिती काढा. पवार कुटुंबातील कुठली व्यक्ती रोहित पवारांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते? अजित पवार आधी आपलं बघा, आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा”, असं नरेश म्हस्के म्हणाले. नरेश म्हस्के यांच्या या दाव्यावर अजित पवारांनी टीका केली. “कोण नरेश म्हस्के? मी त्यांना ओळखत नाही. त्यामुळे अशा आल्तूफाल्तू वक्तव्य करणाऱ्यांना महत्त्व देत नाही. आम्ही कधीच घरामध्ये अशा पद्धतीने वागत नाही. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे, अजित पवाराची तोंडावर जी भूमिका असते तीच मागेदेखील असते”, असं अजित पवार म्हणाले. तसेच रोहित पवार माझ्या मुलासारखा आहे, असंदेखील अजित पवार म्हणाले आहेत.

रोहित पवार यांची नेमकी प्रतिक्रिया काय?

या सगळ्या घडामोडींनंतर आता रोहित पवार यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. “नरेश म्हस्के हे अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यावर बोलले. मी तर साधा कार्यकर्ता आहे. माझा विषय राहत नाही. पण त्यांनी राजकीय उंची पाहवी नंतर वक्तव्य करावं. म्हस्केंना एकच गोष्ट सांगतो, त्यांना क्रिकेट आणि पवार कुटुंब कधीही कळणार नाहीत. तुम्ही प्रयत्न करु नयेत”, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

दरम्यान, नरेश म्हस्के यांनी अजित पवारांवर केलेल्या टीकेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी उत्तर दिलंय. ते म्हणाले, ‘ शिवसेना नेते नरेश म्हस्के यांनी आदरणीय अजितदादा पवार यांच्यावर चुकीचे आरोप केले आहेत. नरेश मस्के तुम्ही मध्यंतरी काय केलं हे राज्यातील जनतेने उघड्या डोळ्यांनी पाहिले आहे. नरेश मस्केजी तुम्ही शिवसेना या पक्षाचे चाळीस आमदार फोडले आणि तुमचे नेते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले त्यामुळे राज्यातील जनता तुम्हाला गद्दार म्हणत आहे. नरेश मस्केजी स्वतःच ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहायचं वाकून हे बंद करा तसेच नरेश मस्केजी उद्धव ठाकरे यांच्याबरोबर गद्दारी करणाऱ्यांना अजितदादा बद्दल बोलण्याचा अधिकार नाही.

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.