AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री महोदय, पत्रास कारण की…, अधिवेशनाच्या काळात रोहित पवारांचं एकनाथ शिंदेंना पत्र

रोहित पवारांचं एकनाथ शिंदेंना पत्र, म्हणाले...

मुख्यमंत्री महोदय, पत्रास कारण की..., अधिवेशनाच्या काळात रोहित पवारांचं एकनाथ शिंदेंना पत्र
| Updated on: Dec 20, 2022 | 11:04 AM
Share

मुंबई : सध्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे. आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. अधिवेशन काळात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिलं आहे. यात त्यांनी महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी पुण्यात सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेची वास्तू असलेल्या भिडेवाड्याची (Bhidewada) दूरवस्था झाल्याने निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

रोहित पवार यांचं पत्र जशास तसं-

मुख्यमंत्री,

महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.

विषय :- महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तु असणारा भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाच्या संवर्धन व विकासाकरीता निधी उपलब्ध होणेबाबत…

महोदय,

उपरोक्त विषयान्वये १ जानेवारी १८४८ साली महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि त्यांच्या सहकारी फातिमा शेख यांनी भिडे वाडयात मुलींची पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुलेच्या कार्यकर्तुत्वाने शिक्षण घेण्याची संधी महिलांना मिळाली आणि त्यामुळेच आज स्त्रिया शिक्षण घेउन आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत. आज प्रत्येक क्षेत्रात स्त्रियानी प्रगती केली आहे. पण स्त्री शिक्षणाचा साक्षीदार असलेला भिडे वाडयाची मात्र दुरावस्था झालेली आहे. बुधवार पेठेतील हा वाडा गेली कित्येक वर्षापासून अखेरचा घटका मोजत असून शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. ज्या वाडयात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यानी पहिली मुलीची शाळा काढली, जिथे स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला. मुली शिकून आपल्या पायावर उभ्या राहिल्या. त्या वास्तुची आजची अवस्था दुर्देवाने फार खराब आहे. सदर ठिकाणी पुन्हा गरीब मुलीसाठी शाळा सुरू होणेबाबत जनसामान्यातून मागणी होत आहे.

उत्तरी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरू केलेल्या पहिल्या मुलीच्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा या राष्ट्रीय स्मारकाच्या संवर्धन व विकासाकरीता निधी उपलब्ध करून पुन्हा मुलींसाठी शाळा सुरू करण्यात यावी, ही विनंती.

आपला स्नेहांकित

रोहित पवार

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.