AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माझ्यासारखे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत राष्ट्रवादी संपणार नाही : धनंजय मुंडे

विशेष म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर पुन्हा एकदा धनंजय मुनंडेंनी टीका केली. छत्रपती घराण्यात फूट पाडणाऱ्या अण्णाजी पंतांना उदयनराजे शरण गेले, असं ते (Dhananjay Munde Aurangabad) म्हणाले.

माझ्यासारखे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत राष्ट्रवादी संपणार नाही : धनंजय मुंडे
| Edited By: | Updated on: Sep 20, 2019 | 8:45 PM
Share

औरंगाबाद : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे (Dhananjay Munde Aurangabad) यांनी पक्ष सोडणाऱ्या नेत्यांसह भाजपावर सडकून टीका केली. शिवाय माझ्यासारखे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत राष्ट्रवादी कधीही संपणार नाही, असं ते म्हणाले. विशेष म्हणजे छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर पुन्हा एकदा धनंजय मुनंडेंनी टीका केली. छत्रपती घराण्यात फूट पाडणाऱ्या अण्णाजी पंतांना उदयनराजे शरण गेले, असं ते (Dhananjay Munde Aurangabad) म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सध्या राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत औरंगाबादमध्ये असताना धनंजय मुंडे यांनी ही टीका केली. “भाजपाध्यक्ष अमित शाह पवार साहेबांवर टीका करतात, पवार साहेबांनी काय केलं, असं म्हणतात. मी त्यांना सांगतो, आमच्या साहेबांनी महाराष्ट्रात जेवढे विमानतळ केले, तेवढे बस स्टॅन्ड सुद्धा तुम्हाला गुजरातमध्ये करता आले नाही. भारतीय जनता पार्टी संपेल, पण जोपर्यंत माझ्यासारखे कार्यकर्ते राष्ट्रवादीत आहेत तोपर्यंत राष्ट्रवादी संपणार नाही”, असं धनंजय मुंडे (Dhananjay Munde Aurangabad) म्हणाले.

उजयनराजेंवर टीका

इतिहासात सुद्धा छत्रपतींच्या घरात फूट पडण्याचं काम अण्णाजी पंतांनी केलं आणि आता 21 व्या शतकात सुद्धा छत्रपतींच्या घरात खुद्द छत्रपती हे अण्णाजी पंतांना शरण गेले आहेत, असं म्हणत धनंजय मुंडेंनी उदयनराजेंवर टीका केली.

“उदयनराजे यांचा भाजप प्रवेश प्रवेश दिल्लीत होणार होता. मला वाटलं त्यांचा प्रवेश पंतप्रधानांच्या हस्ते होईल, पण महाराजांचा प्रवेश शाहांनी केला… महाराजांचा प्रवेश अशा माणसाच्या हातून झाला, ज्याला जेलमध्ये राहावं लागलं, ज्याला तडीपार व्हावं लागलं,” असं म्हणत धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde Aurangabad) अमित शाहांवरही निशाणा साधला.

“प्रकाश आंबेडकरांना पवारांनी निवडून आणलं”

“सध्या कुणीही उठतंय आणि साहेबांवर टीका करतंय. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर सुद्धा साहेबांवर टीका करतात. पण प्रकाश आंबेडकरांना अकोल्यात खुल्या जागेवरून निवडून आणलं, रामदास आठवले हे सुद्धा साहेबांवर टीका करतात. त्यांना सुद्धा खुल्या मतदारसंघातून निवडून आणलं. बाबासाहेबांचं समतेचं खरं तत्व पवार साहेबांनी प्रत्यक्षात आणलं,” असा दावा धनंजय मुंडेंनी केला.

लोकसभा निवडणुकांच्या आधी सगळे तरुण मोदी सरकारला शिव्या देत होते. पण पुलवामा हल्ला झाला आणि सर्जिकल स्ट्राईक केलं. त्यानंतर तरुणाईच्या अंगात देशभक्ती घुसली आणि ‘मोदी है तो मुमकिन है’ म्हणू लागले. पण आता नोकऱ्या गेल्या, पोराला कुणी पोरगी देईना, अवस्था वाईट झाली, असंही धनंजय मुंडे म्हणाले.

पाकिस्तानचा मुद्दा काढल्याशिवाय भाजपची भाषणं पूर्ण होतच नाहीत. पण आमच्या साहेबांवर टीका करू नका, कारण पाकिस्तान आपला भाऊ आहे, हे वक्तव्य मोहन भागवत यांनी केलंय हेही लक्षात ठेवा. पाकिस्तानचा कांदा या देशात आणून विकता आणि आमचा नाशिकचा कांदा उत्पादक शेतकरी आत्महत्या करतोय ही कसली देशभक्ती, असा सवालही धनंजय मुंडेंनी (Dhananjay Munde Aurangabad) केला.

या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना विहिरी दिल्या, त्या सगळ्या विहिरी गुप्त दिल्या. या गुप्त विहरी पाहण्यासाठी भारतीय जनता पार्टीची पुण्यवान नजर लागते. 33 कोटी वृक्षलागवड केली, सगळी झाडं गुप्त आहेत, आता गुप्त विहिरीतलं पाणी गुप्त झाडांना दिलं जाणार आहे, असा टोलाही धनंजय मुंडेंनी लगावला.

“… तर 12 कोटी जनतेसमोर फाशी घेईन”

मुख्यमंत्री म्हणाले, आमच्यावर पाच वर्षात कुठलाही भ्रष्टाचाराचा डाग नाही. मुख्यमंत्री साहेब, जनाची नाही तर मनाची लाज ठेवा. मी तुमच्या 22 मंत्र्यांचे घोटाळे काढले. मी दिलेले पुरावे खोटे ठरले तर सांगा, या 12 कोटी जनतेसमोर फाशी घेईन, असं आव्हानही धनंजय मुंडेंनी दिलं.

हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.