आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव, उद्या तातडीच्या सुनावणीची शक्यता

नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या तातडीने सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणी नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तेव्हापासून नितेश राणे समोर आलेले नाहीत.

आमदार नितेश राणेंची अटकपूर्व जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव, उद्या तातडीच्या सुनावणीची शक्यता
नितेश राणे, आमदार, भाजप
| Edited By: | Updated on: Jan 03, 2022 | 6:06 PM

मुंबई : संतोष परब हल्ला प्रकरणात सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर आता आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. नितेश राणे यांचे वकील अॅड. संग्राम देसाई यांनी ही माहिती दिली आहे. नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर (Bail Application) उद्या तातडीने सुनावणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात शिवसेना आक्रमक झाली आहे. या प्रकरणी नितेश राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र तेव्हापासून नितेश राणे समोर आलेले नाहीत.

नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला आहे. कोर्टातील इतर सुनावणीतून नंबर कधी येतो हे उद्याच कळेल. तसंच सुनावणी कोर्टाच्या नियमावलीनुसार ऑनलाईन होते की कशी हे आज संध्याकाळी कळेल, असं देसाई यांनी सांगितलं. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यात नितेश राणे यांचं नाव समोर आल्यानंतर राणेंच्या वकिलांकडून जिल्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. मात्र, कोर्टाने हा अर्ज नामंजूर केला. त्यानंतर आज मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.

सत्र न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर शिवसैनिकांकडून जल्लोष

आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर स्थानिक शिवसैनिकांकडून जल्लोष करण्यात आला होता. शिवसेनेच्या शाखेसमोर शिवसैनिक मोठ्याप्रमाणात जमले आणि त्यांनी फटाके फोडून कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं होतं. तर आमदार वैभव नाईक यांनी थेट नारायण राणे यांना आवाहन केलं होतं की, नारायण राणे यांनी नितेश राणे यांना पोलिसांसमोर हजर होण्यास सांगावं.

संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामुळं वादंग

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे. संतोष परब यांच्याबाजून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर सध्या राजकीय वादंग पाहायला मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध सेना असा संघर्ष निर्माण झाला आहे.

इतर बातम्या :

Breaking : मुंबई वगळता इतर विभागातील शाळा सुरुच राहणार, शिक्षण विभागाची भूमिका स्पष्ट

अस्तित्व टिकवण्यासाठी ओबीसींना लढावेच लागेल, जितेंद्र आव्हाडांचं आवाहन, ठाण्यात सावित्रीच्या लेकींचा सन्मान