Nitesh Rane : अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे उच्च न्यायालयात धाव घेणार, नारायण राणे पत्नीसह मुंबईकडे रवाना

आता जामिनासाठी नितेश राणे मुंबई उच्च न्यायालयात धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्नीसह मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. तर नितेश राणेंचे वकील अॅड. संग्राम देसाई हे निकालाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर उद्या मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळतेय.

Nitesh Rane : अटकपूर्व जामिनासाठी नितेश राणे उच्च न्यायालयात धाव घेणार, नारायण राणे पत्नीसह मुंबईकडे रवाना
नारायण राणे, नितेश राणे (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Dec 30, 2021 | 8:57 PM

सिंधुदुर्ग : संतोष परब मारहाण प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना झटका बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurga District Court) नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. त्यामुळे आता जामिनासाठी नितेश राणे मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे पत्नीसह मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. तर नितेश राणेंचे वकील अॅड. संग्राम देसाई हे निकालाची प्रत उपलब्ध झाल्यानंतर उद्या मुंबईला जाणार असल्याची माहिती मिळतेय.

सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर अॅड. संग्राम देसाई यांनी नारायण राणे यांची भेट घेत त्यांना कोर्टाच्या निर्णयाची माहिती दिली. त्यावेळी उद्या मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं. त्यानंतर नारायण राणे हे पत्नीसह मुंबईकडे रवाना झाले. तर देसाई हे उद्या मुंबईला जाणार आहे. दरम्यान, उच्च न्यायालयात संग्राम देसाई यांच्यासह अजून काही ज्येष्ठ वकील नितेश राणे यांची बाजू मांडणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.

नितेश राणे 4 दिवसांपासून नॉट रिचेबल

नितेश राणे चार दिवसांपासून नॉट रिचेबल आहेत. ते अद्याप पोलिसांसमोर दाखल झालेले नाहीत. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता नितेश राणे पोलिसांसमोर हजर होणार का? किंवा पोलीस नितेश राणेंना अटक करणार का? असा सवाल केला जात आहे. मात्र, नितेश राणे यांना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. जामीन मिळवण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. तोपर्यंत नितेश राणे यांना पोलिसांकडे हजर होण्याची गरज नाही, असं नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी म्हटलंय. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली तर आम्ही जामीनासाठी अर्ज करु असंही त्यांनी म्हटलंय.

संतोष परब यांच्यावरील हल्ल्यामुळं वादंग

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीदरम्यान संतोष परब यांच्यावर झाला होता. यानंतर संतोष परब यांनी कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता. संतोष परब यांच्याबाजून शिवसेना आक्रमक झाली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर सध्या राजकीय वादंग पाहायला मिळत आहे. यामुळे पुन्हा एकदा राणे विरुद्ध सेना असा संघर्ष निर्माण झाला आहे.

इतर बातम्या :

Corona Virus : दोन दिवसात कठोर निर्बंध, आरोग्यमंत्र्यांचे संकेत; नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन

Maharashtra Corona Update : चिंताजनक… राज्यात कोरोनाचा वेगाने फैलाव, दिवसभरात 5 हजार 300 पेक्षा अधिक रुग्ण

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.