नारायण राणे दिल्लीवरुन सिंधुदुर्गात, नितेश राणेंची कोठडीत भेट

माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे हे पोलीस कोठडीत असलेला पुत्र आणि आमदार नितेश राणे यांना भेटण्यासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले.

नारायण राणे दिल्लीवरुन सिंधुदुर्गात, नितेश राणेंची कोठडीत भेट
Follow us
| Updated on: Jul 06, 2019 | 4:47 PM

सिंधुदुर्ग : माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे हे पोलीस कोठडीत असलेला पुत्र आणि आमदार नितेश राणे यांना भेटण्यासाठी सिंधुदुर्गात दाखल झाले. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे उपअभियंत्यावर चिखलफेकप्रकरणी नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त नारायण राणे दिल्लीत होते, ते आज सिंधुदुर्गात आले. इथे त्यांनी दोडामार्ग तहसीलदार कचेरीतील पोलीस कोठडीत नितेश राणे यांची भेट घेतली. यावेळी नितेश यांच्या मातोश्री निलिमा राणे, भाऊ निलेश राणे हे सुद्धा उपस्थित होते.

दोन दिवसापूर्वी म्हणजेच 4 जुलैला नितेश राणे यांनी उपअभियंते प्रशांत शेडेकर यांना धक्काबुक्की करत चिखलाची आंघोळ घातली होती. याप्रकरणी त्यांना कणकवली न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. नितेश राणेंच्या या कृत्याने नारायण राणे यांनी स्वत: माफी मागितली होती. शिवाय आपण नितेशलाही माफी मागायला सांगू असंही राणे म्हणाले.

काय आहे प्रकरण?

गेल्या काही वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावं लागतं. त्यामुळे आमदार नितेश राणे यांनी आक्रमक पावित्रा घेत उपअभियंत्याला धक्काबुक्की केली.  आक्रमक झालेल्या नितेश राणेंनी उपअभियंते प्रकाश शेडेकर यांना पुलाला बांधण्याच्या प्रयत्न करुन, थेट हायवेवरील चिखलाने आंघोळ घातली.  नितेश राणेंनी शेडेकर यांना शिव्यांची लाखोली वाहिली.

मुंबई गोवा महामार्गाची दुरावस्था झाली आहे. रस्त्यात अनेक ठिकाणी पडलेले खड्डे, जागोजागी पसरलेले खडीचे साम्राज्य, तसेच सातत्याने अपघात होत असतात. त्यामुळे नितेश राणे यांनी सिंधुदुर्गात जाऊन उप अभियंता प्रकाश शेडेकर यांची भेट घेतली. त्यानंतर आक्रमक झालेल्या राणेंनी शेडेकर यांना हाताला धरुन महामार्गाची जबरदस्तीने पाहणी करायला लावली. पाहणी झाल्यानंतर त्यांनी शेडेकर यांना शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर चिखलाच्या बादल्या ओतल्या. एव्हढंच नव्हे तर त्यांना महामार्गाला बांधून ठेवण्याचा प्रयत्नही करण्यात आला.

नितेश राणेंना 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी

उपअभियंत्यावर चिखलफेक करणारे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या समर्थकांची कोठडी 9 जुलैपर्यंत वाढवण्यात आली आहे. कणकवलीतील दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे नितेश राणे यांना  5 रात्री पोलीस कोठडीतच काढाव्या लागणार आहेत. आमदार नितेश राणे यांच्यासह समर्थकाना पोलीसांनी काल संध्याकाळी अटक केली होती. मात्र छातीत दुखू लागल्याचं कारण देत नितेश राणे हे ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल झाले होते. आज  आमदार नितेश राणे यांच्यासह 18 समर्थकांना दुपारी कणकवली येथील दिवाणी न्यायालयात हजर केले.  कोर्टाने त्यांना 9 जुलैपर्यंत कोठडीतच ठेवण्याचे आदेश दिले.

संबंधित बातम्या 

नितेश तू चुकलास, मी माफी मागतो : नारायण राणे

चंद्रकांत दादांसमोर प्रकाश शेडेकरांची आई ढसाढसा रडली    

नितेश राणे योग्यच, त्यांची तात्काळ सुटका करा : संदीप देशपांडे 

नितेश राणेंना जामीन नाहीच, आणखी 5 रात्री पोलीस कोठडीतच! 

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.