Nitesh Rane : मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता, राज्यात हिंदूंना दहशतवादी संघटनांकडून टार्गेट केलं जातं; नितेश राणेंचं ट्विट चर्चेत

काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. काश्मीर खोऱ्यातील हिंदू भयभीत झाला आहे. महिनाभरात नऊ हिंदूच्या आत्महत्या झाल्या आहेत. तिथून अनेक हिंदू आपलं घर सोडून इतर प्रदेशात जात आहेत.

Nitesh Rane : मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंता, राज्यात हिंदूंना दहशतवादी संघटनांकडून टार्गेट केलं जातं; नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची चिंताImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 05, 2022 | 9:34 AM

मुंबई – महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांना काश्मिरी पंडितांची (Kashmiri pandits) चिंता आहे. पण त्याच्याच राज्यात राहणाऱ्या हिंदूंना रझा अकादमी आणि पीएफआय सारख्या दहशतवादी संघटनांकडून नेहमीच लक्ष्य केले जाते त्याचे काय? त्यांना कोण वाचवणार? काश्मीर मोदींच्या (Narendra Modi) सुरक्षित हातात आहे. त्याची काळजी करू नका!! असं ट्विट भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh Rane)यांनी केले आहे. काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत असं विधान मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. काश्मीर खोऱ्यातील हिंदू भयभीत झाला आहे. महिनाभरात नऊ हिंदूच्या आत्महत्या झाल्या आहेत. तिथून अनेक हिंदू आपलं घर सोडून इतर प्रदेशात जात आहेत अशी अनेक वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्याला नितेश राणे यांनी ट्विटच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

नितेश राणेंची सरकारवरती जोरदार टीका

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार स्थापण झाल्यापासून भाजपचे नेते नितेश राणे महाविकास आघाडीवरती नेहमी आक्रमक टीका करतात. ईडीने महाराष्ट्रात कारवाई सुरू केल्यापासून महाराष्ट्रातील विरोधक सत्ताधाऱ्यांवरती जोरदार टीका करीत आहेत. राज्यात सध्या भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली अशी अनेकदा नितेश राणेंनी टीका केली आहे.

महिनाभरात काश्मीर खोऱ्यात नऊ पंडीतांच्या हत्या

मागच्या महिनाभरात काश्मीर खोऱ्यात नऊ पंडीतांच्या हत्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे काश्मीर पंडीतांचा विषय देशात चर्चेत आला आहे. काश्मीर पंडीतांना शोधून मारलं जात आहे अशी ओरड होत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल त्याबाबत चिंता व्यक्त केली. तिथल्या काश्मीर पंडीतांशा घर वापशीची स्वप्न दाखवली. परंतु त्यांच्या स्वप्नाचा चुराडा कशा पद्धतीने होत आहे सगळेचं पाहत आहेत अशा पद्धतीची केंद्र सरकारवरती केली.

त्यानंतर नितेश राणे यांनी त्यांनी महाराष्ट्रातील जनतेची काळजी घ्या असा सूचक टोला ट्विटरच्या माध्यमातून लगावला आहे.

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.