AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हनुमानाच्या जातीच्या वादात आता मोरारी बापूंची उडी

सिमरिया : हनुमान दलित होता, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटल्यानंतर, देशभरात हनुमानाच्या जातीची चर्चा सुरु झाली. हनुमान दलित नसून, आदिवासी होता, असं मत अनेकांनी मांडलं. तर हनुमान दलित किंवा आदिवासी नसून तो जैन असल्याचा दावा राजस्थान येथील जैन आचार्य निर्भय सागर यांनी केला. यानंतर आता प्रसिद्ध प्रवचनकार मोरारी बापू यांनी देखील या […]

हनुमानाच्या जातीच्या वादात आता मोरारी बापूंची उडी
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Jul 05, 2019 | 4:54 PM
Share

सिमरिया : हनुमान दलित होता, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटल्यानंतर, देशभरात हनुमानाच्या जातीची चर्चा सुरु झाली. हनुमान दलित नसून, आदिवासी होता, असं मत अनेकांनी मांडलं. तर हनुमान दलित किंवा आदिवासी नसून तो जैन असल्याचा दावा राजस्थान येथील जैन आचार्य निर्भय सागर यांनी केला. यानंतर आता प्रसिद्ध प्रवचनकार मोरारी बापू यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. हनुमानाला दलित म्हणण्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच त्यांनी हनुमानाला जातीच्या कचाट्यात फसवणाऱ्या योगी आदित्यनाथ आणि इतरांची निंदाही केली.

मंगळवारी ओरिसा येथील सिमरियात साहित्य महाकुंभात ते संबोधित करत होते. तेव्हा त्यांनी याबाबत आपले मत व्यक्त करत सांगितले की, “आज संपूर्ण देशात हनुमानाच्या जाती-पातीची चर्चा सुरु आहे. ती बंद करा. तुम्ही फक्त आपल्या खासगी स्वार्थासाठी हवे तसे वक्तव्य देत असता, ज्यामुळे भारताचं नुकसान होत आहे. आम्ही जोडण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तुम्ही तोडण्याचा. बस करा आता. हनुमान प्राणवायू आहेत. हनुमान सर्वांचे आहेत. कुणीही त्यांना जाती-पातीत विभक्त करु शकत नाही.”

हनुमान दलित होता : योगी आदित्यनाथ

हनुमान दलित होता की अदिवासी हे सर्व प्रकरण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याने सुरु झालं. उत्तर प्रदेशमध्ये दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केलं असं बोललं जात आहे.

“हनुमान एक असे देवता आहेत की, ते स्वत: दलित आहेत. हनुमानने दक्षिण भारतापासून ते उत्तर भारतापर्यंत सर्वांना जोडण्याचे काम केलं. त्यामुळे आपला संकल्प हा हनुमानासारखा असायला हवा.” असं मत योगी आदित्यनाथ यांनी मांडलं होत.

Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!