निकालाआधीच ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांचं मोदींना शपथविधीचं निमंत्रण

भुवनेश्वर : ओदिशामध्ये बिजू जनता दल (बीजेडी) ने विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रणही दिलंय. ओदिशामध्ये विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक एकत्रितपणे होत आहे. 23 मे रोजी निकाल लागणार आहे, त्यापूर्वीच पटनायक यांनी पुन्हा आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केलाय. बीजेडीच्या उमेदवाराचा प्रचार करत असताना […]

निकालाआधीच ओदिशाच्या मुख्यमंत्र्यांचं मोदींना शपथविधीचं निमंत्रण
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:00 PM

भुवनेश्वर : ओदिशामध्ये बिजू जनता दल (बीजेडी) ने विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शपथविधी सोहळ्याला येण्याचं निमंत्रणही दिलंय. ओदिशामध्ये विधानसभा आणि लोकसभेची निवडणूक एकत्रितपणे होत आहे. 23 मे रोजी निकाल लागणार आहे, त्यापूर्वीच पटनायक यांनी पुन्हा आपणच मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा केलाय.

बीजेडीच्या उमेदवाराचा प्रचार करत असताना पटनायक यांनी विजयाचा दावा केला. पहिल्या तीन टप्प्यात बीजेडीला आवश्यक मतं मिळाले आहेत, त्यामुळे राज्यात सरकार आमचंच असेल, असं ते म्हणाले. 29 एप्रिल रोजी होणाऱ्या चौथ्या टप्प्यातील मतदानात ओदिशामधील काही जागांचाही समावेश आहे. प्रचारादरम्यान त्यांनी भाजपवरही निशाणा साधला.

मंगळवारी प्रचार करताना पटनायक म्हणाले, पंतप्रधानांनी जाहीर केलंय, की बीजेडी सरकार गेल्यानंतर मी पुन्हा ओदिशाचा दौरा करण्यासाठी येईल. पण पहिल्या तीन टप्प्यात आम्हाला आवश्यक मतं मिळाले आहेत. त्यामुळे मी मोदीजींना निमंत्रण देतो, की त्यांनी माझ्या शपथविधी सोहळ्यासाठी आवर्जून यावं, असं पटनायक म्हणाले.

ओदिशामध्ये लोकसभेच्या एकूण 21 जागा आहेत. भाजपने या राज्यातील सर्वच्या सर्व जागा जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. इथे भाजप आणि बीजेडीमध्ये प्रमुख लढत आहे. तर यासोबतच विधानसभा निवडणूकही असल्याने भाजपचा राज्यातील सत्तेवरही डोळा आहे.

Non Stop LIVE Update
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला
खैरेंनी मुस्लिमांना सांगितल, 5 वेळा नमाज पडा; शिरसाटांनी व्हिडीओ लावला.
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा
महाराष्ट्रातील नरेंद्र मोदींच्या सभांच्या झंझावातावर विरोधकांचा निशाणा.
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?
महायुतीत मुंबईत 2 जागांवर सस्पेन्स, 'या' उमेदवारांची चर्चा, कधी घोषणा?.
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?
जप्तीनंतर भेट; लवकरच शरद पवार गटाच्या अभिजीत पाटलांचा भाजपात प्रवेश?.
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.