Belgaum by-election | भाजपची नवी खेळी, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लिंगायत धर्मगुरुंसोबत खासगी बैठक, समीकरणं बदलणार ?

कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी थेट लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंची भेट घेऊन मंगला अंगडी यांच्यासाठी पाठिंबा मागितला आहे. (belgaum by election b s yediyurappa mangala angadi)

Belgaum by-election | भाजपची नवी खेळी, प्रचाराच्या शेवटच्या दिवशी लिंगायत धर्मगुरुंसोबत खासगी बैठक, समीकरणं बदलणार ?
B S YEDIYURAPPA MEETING
prajwal dhage

|

Apr 16, 2021 | 8:20 PM

बेळगाव : बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा आज समारोप झाला. शनिवारी (17 एप्रिल) येथे प्रत्यक्ष मतदान होणार आहे. मात्र, प्रचार संपण्याच्या पूर्वसंध्येला येथे अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. मंगला अंगडी यांच्या विजयासाठी भाजपने कसोसीने प्रचार केला आहे. त्यानंतर आज शेवटचा प्रयत्न म्हणून कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा (B S Yediyurappa) यांनी थेट लिंगायत समाजाच्या धर्मगुरूंची भेट घेऊन मंगला अंगडी (Mangala Angadi) यांच्यासाठी पाठिंबा मागितला आहे. (on occasion of Belgaum by election B S Yediyurappa and Mangala Angadi secret meeting with Lingayat dharma guru)

तब्बल 70 धर्मगुरु उपस्थित

भाजपच्या उमेदवार मंगला अंगडी या लिंगायत समाजाच्या आहेत. त्यामुळे त्यांना लिंगायत समाजाकडून चांगला पाठिंबा मिळू शकतो हा कयास भाजपने बांधला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आज प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यामुळे भाजपने शक्य होईल तेवढा जोरदार प्रचार केला. याच गोष्टीचा विचार करत आज (16 एप्रिल) कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी लिंगायत समाजाच्या धर्मगुरुंची भेट घेतली. ही भेट हुक्केरी येथील हिरेमठ धर्मशाळा येथे पार पडली. या भेटीदरम्यान जवळपास 70 धर्मगुरू उपस्थित होते. तसेच यावेळी मंगला अंगडी यांच्या विजयासाठी सुदर्शन यज्ञसुद्धा करण्यात आला.

आतापर्यंत धर्मगुरु राजकारणापासून लांब

कर्नाटकचे मुख्यमंत्री येदियुरप्पा हे स्वत: लिंगायत समाजाचे आहेत. तसेच मंगला अंगडी यासुद्धा लिंगायत समाजाच्या आहेत. यापूर्वी बेळगाव लोकसभा मतदारसंघात लिंगायत विरुद्ध लिंगायत समाजाचा उमेदवार अशी लढत व्हायची. याच कारणामुळे लिंगायत समाजाचे धर्मगुरू कोणत्याही उमेदवाराला थेट पाठिंबा देत नसत. ते राजकारण आणि पाठिंब्यापासून स्वत:ला दूर ठेवत. मात्र, यावेळी येदियुरप्पा आणि मंगला अंगडी यांनी तब्बल 70 धर्मगुरुंची भेट घेत मंगला अंगडी यांच्यासाठी पाठिंबा मागितला आहे. या भेटीमुळे बेळगावात राजकीय समीकरणं बदलणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

येदियुरप्पा आणि धर्मगुरुंची खासगी बैठक

यावेळच्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार मंगला अंगडी याच फक्त लिंगायत समाजाच्या आहेत. त्यामुळे भाजपला लिंगायत समाजाचा पाठिंबा मिळवणे सोपे असल्याचे वाटत आहे. याच कारणामुळे लिंगायत समाजाचे धर्मगुरू चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी आणि येदियुरप्पा या दोघांमध्ये खासगीमध्ये बैठक झाल्याचीसुद्धा माहिती आहे.

लिंगायत समाज किंगमेकर

बेळगाव लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक लोकसंख्या लिंगायत मतदारांची आहे. एकूण 18 लाख 13 हजार 538 मतदारांपैकी लिंगायत मतदार 6.25 लाख आहेत. यापैकी 3.25 लाख मराठी मतदार आहेत. 1.80 लाख कुरबर, 65 हजार विणकर, 40 हजार जैन, 40 हजार ब्राह्मण, 2 लाख मुस्लिम आणि 2 लाख मागासवर्गीय मतदार आहेत. भाजपचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा हे लिंगायत समाजाचे आहेत.

इतर बातम्या :

आधी संजय राऊतांना मैदानात उतरवलं, आता स्वत: सायकलवर प्रचार, धैर्यशील मानेंनी बेळगाव पिंजलं!

Belgaum Bypoll: ‘देवेंद्र फडणवीस बेळगावात प्रचाराला आले तर ते महाराष्ट्रद्रोही असल्याचे सिद्ध होईल’

महाराष्ट्र एकीकरण समितीचे शुभम शेळके जिंकणार का?, काय आहे बेळगाव लोकसभा मतदारसंघाचं गणित?; वाचा सविस्तर

(on occasion of Belgaum by election B S Yediyurappa and Mangala Angadi secret meeting with Lingayat dharma guru)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें