AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आठ दिवसात ब्रेकिंग न्यूज मिळणार, ऑपरेशन टायगर 3 बाबत सर्वात मोठी अपडेट

Operation Tiger 3 : गेल्या काही काळापासून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत आहे, अशातच आता ऑपरेशन टायगर 3 बाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मोठी बातमी! आठ दिवसात ब्रेकिंग न्यूज मिळणार, ऑपरेशन टायगर 3 बाबत सर्वात मोठी अपडेट
operation tiger 3Image Credit source: Google
| Updated on: Jul 05, 2026 | 4:18 PM
Share

राज्याच्या राजकारणात गेल्या काही काळापासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या 6 खासदारांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला होता. या पक्षप्रवेशाची देशभरात चर्चा रंगली आहे, कारण शिवसेना हा आता महाराष्ट्रातील सर्वाधिक खासदार असणारा पक्ष बनला आहे. त्यानंतर विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची ताकद आणखी वाढली आहे.

8 दिवसात…

राज्यातील या पक्षांतरानंतर आता ऑपरेशन टायगर 3 बाबत चर्चा रंगली आहे. अनेक नेत्यांनी यावर सकारात्मक भाष्य केले आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी ऑपरेशन टायगर 3 बाबत सर्वात मोठी अपडेट दिली आहे. याबाबत प्रश्न विचारला असता भोंडेकर यांनी म्हटले की, ‘लोक येतात जातात तुम्ही काळजी करू नका ब्रेकिंग न्यूज मिळत राहील, येत्या 8 दिवसात ऑपरेशन टायगर 3 होईल.’ भोंडेकर यांच्या या विधानानंतर आता आगामी काळात शिवसेनेत मोठ्या प्रमाणात इनकमिंग होण्याची शक्यता आहे.

प्रकाश आबिटकरांनीही दिले संकेत

याआधी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनीही ऑपरेशन टायगर 3 बाबत भाष्य केले होते. प्रकाश आबिटकर यांनी म्हटले की, ऑपरेशन टायगर-3 कधी होईल तेही कळणार नाही, एकनाथ शिंदे यांच्या झंझावातात अनेक आमदार, माजी मंत्री शिवसेनेत येणार आहेत. केंद्रातील शिवसेनेचा चेहरा शिंदे साहेब राजकीय उपलब्धतेनुसार ठरवतील. आमचा भर संघटना मजबूत करण्यावर आहे.

शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय शिरसाट यांनीही ऑपरेशन टायगर 3 बाबत मोठी माहिती दिली होती. आमचे ऑपरेशन 3.0 सुरू झाले आहे. आता महाभुकंप होणार आहे. हे कधी होणार ते एकनाथ शिंदे ठरवणार आहेत असं शिरसाट यांनी म्हटलं होतं. दरम्यान, आतापर्यंत शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी ऑपरेशन टायगर 3 बाबत भाष्य केलेले आहे, सर्व नेत्यांनी आगामी काळात मोठा पक्षप्रवेश होण्याचे भाकित केले आहे, त्यामुळे आगामी काळात पुन्हा मोठ्या प्रमाणात पक्षांतर पहायला मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
मराठा आरक्षणासाठी दातेंच्या उपोषणाची धार कायम
मराठा आरक्षणासाठी राजेंद्र दातेंच्या उपोषणाचा 12 वा दिवस
मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी
अमित ठाकरे यांचा सडेतोड इशारा; मुलींना हात लावाल तर मार खाणारच
आमच्याकडे अधिकार आहेत यात... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं...
आमच्याकडे अपात्र करण्याचे अधिकार आहेत, यामध्ये... कोर्टाची सर्वात मोठी टिप्पणी, नेमकं निरिक्षण काय?
मुंबईत ऑटो, टॅक्सी चालकांसाठी आरटीओची मराठी भाषा तपासणी मोहीम
मुंबईत आरटीओची कारवाई: ऑटो, टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे...
दादरमध्ये अमराठी टॅक्सी चालकांची पोलिसांकडून तपासणी, दंडवसुलीमुळे चालकांमध्ये संताप
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवका
ठाकरेंना सर्वात मोठा धक्का! कालच बैठक घेतली अन् आज ठाकरेंच्या नगरसेवकांनी... अखेर ज्याची भीती तेच घडलं
लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप
Abhijeet Dipke | लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या मुलांना... अभिजीत दीपके यांचा संताप, नेमकं काय घडलं?
थोड्याच वेळात शिवसेना चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील सरोदेंचं वक्तव्य
अध्यक्षांनी साक्ष, पुरावे, प्रश्नोत्तरे सगळंच... थोड्याच वेळात शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी, इतक्यात वकील असीम सरोदेंचं विधान चर्चेत
संजय राऊतांकडे तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी...
संजय राऊतांकडे तडजोड करण्याची मागणी, नारायण राणे मानहानी प्रकरणी नेमकं काय घडलं?
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या
शिंदे यांची धावपळ आणि... शिवसेना पक्षाची सुनावणी सुरु होण्याआधीच बड्या नेत्याचं मोठं विधान