AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंढरपूरचा आधारवड हरपला, दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास

सुधाकरपंत परिचारक यांचे सर्व अंत्यविधी कोरोनाच्या नियमावलीत पुणे येथे पार पडतील, अशी माहिती नातू प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवरुन दिली आहे.

पंढरपूरचा आधारवड हरपला, दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे निधन, पुण्यात अखेरचा श्वास
| Updated on: Aug 18, 2020 | 7:35 AM
Share

पंढरपूर : पंढरपूरमधील दिग्गज नेते सुधाकरपंत परिचारक यांचे निधन झाले. सुधाकरपंत यांनी काल रात्री (17 ऑगस्ट) साडेअकराच्या सुमारास पुण्याच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर गेल्या आठ दिवसांपासून उपचार सुरु होते. वयाच्या 85 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. परिचारक यांनी 25 वर्ष महाराष्ट्र विधानसभेची आमदारकी भूषवली होती. (Pandharpur Senior Leader Sudhakar pant Paricharak Dies during treatment on Corona in Pune Hospital)

सुधाकरपंत परिचारक गेले 2 दिवस व्हेंटिलेटरवर होते. त्यांचे सर्व अंत्यविधी कोरोनाच्या नियमावलीत पुणे येथे पार पडतील, अशी माहिती नातू प्रितीश परिचारक यांनी फेसबुकवरुन दिली आहे.

गेली 50 वर्षे ज्यांचा आधार पूर्ण जिल्ह्याला होता त्यांना आज आपल्या प्रार्थनेच्या आधाराची गरज आहे, अशी भावनिक पोस्ट प्रितीश परिचारक यांनी दोनच दिवसांपूर्वी केली होती. “तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमकडून सर्वोत्तम उपचार चालू आहेत. वृद्धापकाळ, पूर्वीचे साखर आणि रक्तदाब यासारखे आजार आणि नव्याने उद्भवलेला COVID न्यूमोनिया यामुळे त्यांची ही कोरोनाची लढाई कठीण होत आहे” असे ते म्हणाले होते.

सुधाकरपंत परिचारक यांचा परिचय

सुधाकरपंत परिचारक यांनी 25 वर्ष महाराष्ट्र विधानसभेची आमदारकी भूषवली होती. परिचारक यांनी 2019 मध्येही शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार म्हणून पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याकडून त्यांचा पराभव झाला.

सुधाकरपंत परिचारक हे अनेक वर्ष राष्ट्रवादीचे आमदार होते. 2009 मध्ये सुधाकरपंत परिचारक यांना पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी जाहीरही झाली होती. मात्र ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासाठी पंतांनी उमेदवारी मागे घेतली. परंतु मोहिते पाटलांना पराभवाचा सामना करावा लागला. (Pandharpur Senior Leader Sudhakar pant Paricharak Dies during treatment on Corona in Pune Hospital)

गेल्या दहा वर्षांच्या काळात सुधाकरपंत निवडणुकांपासून लांब राहिले. पंचाहत्तरी गाठल्यानंतर इतरांना संधी देण्यासाठी सुधाकरपंतांनी ‘बॅक टू पॅव्हेलियन’ करणं पसंत केलं होतं. 2014 च्या निवडणुकीपासून परिचारकांनी राष्ट्रवादीसोबतही काडीमोड घेतला. मात्र कार्यकर्त्यांचा जोश पाहून गेल्या वर्षी सुधाकरपंतांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली.

सुधाकरपंत हे भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते आहेत. त्यामुळे भाजपकडून निवडणूक लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. भाजपने तिकीट न दिल्यास अपक्ष लढा, असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे होते, मात्र भाजपने त्यांना तिकीट दिल्याने सुधाकरपंत रिंगणात उतरले.

संबंधित बातमी :

पंढरपूरचे ज्येष्ठ नेते सुधाकरपंत परिचारक यांना कोरोना, ‘मोठ्या मालकांसाठी प्रार्थना करा’, नातवाची भावूक पोस्ट

(Pandharpur Senior Leader Sudhakar pant Paricharak Dies during treatment on Corona in Pune Hospital)

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.